ETV Bharat / bharat

बिहार विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले, सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५३.५३ टक्के मतदान - बिहार निवडणूक पहिल्या टप्प्यातील मतदान लाईव्ह

Bihar Assembly Elections first phase of Voting LIVE updates
बिहार विधानसभा निवडणूक : थोड्याच वेळात होणार पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
author img

By

Published : Oct 28, 2020, 6:52 AM IST

Updated : Oct 28, 2020, 7:37 PM IST

19:22 October 28

पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली

बिहार विधासनभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. १६ जिल्ह्यातील ७१ मतदार संघासाठी आज मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 53.53% टक्के मतदान झाले. 

17:44 October 28

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५१ टक्के मतदान

15:33 October 28

७१ पैकी ३१ जागांवरील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली

बिहारमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत ४६.२९ टक्के मतदान 

15:23 October 28

नक्षलग्रस्त चार मतदारसंघातील मतदान पूर्ण

बिहारमधील नक्षलग्रस्त चार मतदारसंघातील मतदान पूर्ण झाले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या चार जागांवर सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत मदतान झाले. राज्यात सध्या ६७ जागांवरील मतदान सुरू आहे.  

13:32 October 28

दुपारी एकपर्यंत ३३ टक्क्यांहून अधिक मतदान..

बिहारच्या १६ जिल्ह्यांमध्ये दुपारी एकपर्यंत एकूण ३३ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे.

13:15 October 28

राजद आमदाराच्या गाडीवर स्थानिकांचा हल्ला; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

बडहरामधील राजद आमदार सरोज यादव यांच्या गाडीवर स्थानिकांनी हल्ला केला. यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. यादव यांनी या हल्लेखोरांमध्ये भाजप कार्यकर्ते सामील असल्याचा आरोप केला आहे.

12:08 October 28

मतदान करतानाचा फोटो व्हायरल, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश..

मतदान करतानाचा ईव्हीएम मशीनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आज होत असलेल्या मतदानाच्या वेळीचाच हाच फोटो असल्यामुळे, निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अधिक खबरदारी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याबाबतचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

11:48 October 28

पाटण्यात मतदानाचा वेग मंदावला, बांकामध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदान

बांकामध्ये सकाळी अकरापर्यंत सर्वाधिक (२२.५८ टक्के) मतदानाची नोंद झाली आहे. तर, सकाळी आठपर्यंत आघाडीवर असलेल्या पाटणामध्ये मतदानाचा वेग कमी झालेला पहायला मिळाला. अकरा वाजेपर्यंत पाटण्यात १८.९७ टक्के मतदान झाले होते.

11:46 October 28

लखीसरायमध्ये मतदानावर बहिष्कार..

लखीसरायमध्ये मतदानावर बहिष्कार..

लखीसरायमध्ये असलेल्या एका खेळाच्या मैदानावर वस्तूसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आमचे खेळाचे मैदान परत मिळाल्याशिवाय मतदान करणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे.

11:44 October 28

मुंगेरमध्ये मतदानावर बहिष्कार..

मुंगेरमध्ये मतदानावर बहिष्कार..

मंगळवारी दुर्गा विसर्जानवेळी झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध म्हणून मुंगेरच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. तसेच, दुर्गापूजा उत्सवादरम्यान मतदानाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली आहे.

11:06 October 28

अकरा वाजेपर्यंत १८.४८ टक्के मतदान..

बिहारमधील १६ जिल्ह्यांमध्ये मिळून सकाळी अकरा वाजेपर्यंत १८.४८ टक्के मतदान पार पडले आहे.

11:04 October 28

प्रेम कुमार यांच्यावर कारवाई होणार - निवडणूक आयोग

भाजप नेते प्रेम कुमार यांनी आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

10:45 October 28

भाजप नेत्याने केले आचारसंहितेचे उल्लंघन..

भाजप नेते प्रेम कुमारांनी केले आचारसंहितेचे उल्लंघन

बिहारमधील भाजप नेते प्रेम कुमार यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. गयामध्ये मतदानासाठी मतदान केंद्रावर गेले असता, प्रेम कुमार यांनी भाजपचे निवडणूक चिन्ह असलेला मास्क घातला होता. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे.

10:43 October 28

पालीगंजमध्ये नागरिकांची मतदान केंद्राकडे पाठ..

पालीगंज मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २३६वर सकाळपासून मतदानच झाले नाही. परिसरातील रस्त्यांचा प्रश्न जोपर्यंत सोडवला जात नाही, तोपर्यंत आपण मतदान करणार नसल्याचा पवित्रा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत येथे मतदान सुरूच झाले नाही.

10:03 October 28

पोलिंग एजंटचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नवादामध्ये भाजपचे पोलिंग एजंट कृष्णा सिंह यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. आज पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना हिसुआ विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र क्रमांक २५८वर ही घटना घडली.

10:01 October 28

मतदान केंद्रावर मतदाराचा मृत्यू..

रोहतासमध्ये मतदान केंद्र क्रमांक १५१वर एका मतदाराचा मृत्यू झाला आहे. मतदान प्रक्रिया सुरू असतानाच तब्येत अचानक खालावल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला.

09:41 October 28

श्रेयांशी सिंह यांनी केले मतदान..

भाजपच्या जमुईमधील उमेदवार आणि नेमबाज श्रेयांशी सिंह यांनी जिल्ह्यातील नया गाव येथे असलेल्या मतदान केंद्रावर मतदान केले.

09:28 October 28

राहुल गांधींनी दिल्या मतदारांना शुभेच्छा..

राहुल गांधींनी ट्विटरद्वारे मतदारांना शुभेच्छा दिल्या आहेत. "यावेळी न्याय, रोजगार आणि शेतकरी-मजूरांसाठी केवळ महागठबंधनला मतदान करा. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या शुभेच्छा" अशा आशयाचे ट्विट गांधींनी केले आहे.

09:24 October 28

गयामध्ये भाजपची अरेरावी; महिला मतदारांचा गोंधळ

गयामधील मतदान केंद्र क्रमांक १३३ वर महिला मतदारांनी गोंधळ घातला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी परिसरात येत भाजपला मतदान करण्यासाठी दमदाटी सुरू केली. त्यानंतर मतदारांनी गोंधळ घातला.

09:23 October 28

दोन तासांमध्ये ५.३२ टक्के मतदान..

सकाळी नऊ वाजेपर्यंत एकूण ५.३२ टक्के मतदान पार पडले आहे.

09:14 October 28

जमुईमध्ये अद्याप मतदानास सुरुवात नाही, रद्द करण्याची मागणी

जमुई जिल्ह्यातील कित्येक मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान सुरू होऊ शकले नाही. मतदानाची वेळ सुरू होऊन दोन तास उलटूनही याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे, आजचे मतदान रद्द करुन ते पुन्हा घेण्यात यावे अशी मागणी कित्येक ठिकाणी करण्यात येत आहे.

08:57 October 28

झेनाबादमध्ये ईव्हीएम मशीन घोटाळ्यामुळे मतदानास उशीर..

झेनाबाद मतदारसंघातील १७० क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे तेथील मतदान प्रक्रिया खोळंबली आहे.

08:31 October 28

पाटणामध्ये पहिल्या तासात सर्वाधिक, तर शेखपुरामध्ये सर्वात कमी मतदान

पहिल्या तासात पाटणामध्ये सर्वाधिक चार टक्के मतदान पार पडले आहे. तर, शेखपुरामध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.

08:13 October 28

तासाभरात २.४ टक्के मतदान..

सकाळी सात वाजता सुरुवात झाल्यानंतर, पहिल्या तासाभरात एकूण २.४ टक्के मतदान झाले आहे. तसेच, कित्येक ठिकाणी ईव्हीएम मशीन खराब असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

08:11 October 28

सहा हजार मतदान केंद्रे संवेदनशील..

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आज एकूण ३१ हजार ३८० मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. यांपैकी सहा हजार मतदान केंद्रे ही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील आहेत.

07:58 October 28

मतदानासाठी मोदींचे आवाहन..

  • बिहार विधानसभा चुनावों में आज पहले दौर की वोटिंग है।

    सभी मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे कोविड संबंधी सावधानियों को बरतते हुए, लोकतंत्र के इस पर्व में अपनी हिस्सेदारी सुनिश्चित करें।

    दो गज की दूरी का रखें ध्यान, मास्क जरूर पहनें।

    याद रखें, पहले मतदान, फिर जलपान!

    — Narendra Modi (@narendramodi) October 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सर्व मतदारांना माझी विनंती आहे, की त्यांनी कोरोना संबंधी खबरदारी बाळगत लोकशाहीच्या या उत्सवात आपला सहभाग नोंदवावा. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत, मास्कचा वापर करत मतदान करा", अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधानांनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

07:48 October 28

गयामध्ये मतदानास सुरुवात..

गयामध्ये मतदानास सुरुवात..

गयामध्ये मतदानास सुरुवात झाली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत लोक मतदानासाठी हजेरी लावताना दिसून येत आहेत. शिवसेना उमेदवार ब्युटी सिन्हा गया शहरमधून निवडणूक लढवत आहेत.

07:41 October 28

औरंगाबादमध्ये स्फोटके जप्त.

  • Two Improvised explosive devices recovered and defused by Central Reserve Police Force from Aurangabad's Dhibra area, earlier today.

    Polling for the first phase of #BiharElections is underway.

    — ANI (@ANI) October 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बिहारच्या औरंगाबादच्या ढिब्रा भागामध्ये आज दोन स्फोटक साधने (आयईडी) जप्त करुन निकामी करण्यात आली आहेत. राष्ट्रीय राखीव पोलीस दलाने ही कारवाई केली. याठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी मतदानात अडथळा आणण्यासाठी ही स्फोटके पेरली होती.

07:07 October 28

शिवसेनेच्या तीन उमेदवारांचे भवितव्य ठरणार आज..

बिहारमधील वजीरगंज, गया शहर आणि पालीगंज या मदतदारसंघामध्ये आज मतदान पार पडणार आहे. याठिकाणी शिवसेनेचे उमेदवारही उभे आहेत.

07:05 October 28

मतदानाला सुरुवात..

पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे.

06:47 October 28

तेजस्वी यादवांचे आवाहन..

पहिल्या टप्प्यातील मतदान लवकरच सुरू होणार आहे. लोकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन राजद नेते तेजस्वी यादव यांनी केले आहे.

06:37 October 28

आज पहिल्या टप्प्यातील मतदान; ठरणार १०६६ उमेदवारांचे भवितव्य..

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडणार आहे. १६ जिल्ह्यांमधील ७१ जागांसाठी हे मतदान असणार आहे. एकूण १०६६ उमेदवारांचे भवितव्य आज होणाऱ्या मतदानावर ठरणार आहे.

Last Updated : Oct 28, 2020, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.