ETV Bharat / bharat

बिगबॉस फेम दीपक ठाकूरचे घर महापुरात बुडाले, मोदींकडे मदतीची मागणी - bihar news

या पार्श्वभूमीवर दीपकने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सलमान खान, सोनू सूद यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करत त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना बँक खाते क्रमांक ही दिला आहे.

Deepak thakur
Deepak thakur
author img

By

Published : Aug 1, 2020, 1:04 PM IST

मुजफ्फरपूर - बिहारमध्ये महापुराची स्थिती फार भीषण झाली आहे. या गंडक नदीच्या महापुरात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 40 लाख नागरिकांना या पुराचा तडाखा बसला आहे. तसेच बिग बॉस फेम आणि गायक दीपक ठाकूर याचे आथर गावही या महापुरात वेढले गेले आहे.

बिगबॉस फेम दीपक ठाकुरचे घर महापुरात बुडाले, मोदींकडे मदतीची मागणी

या पार्श्वभूमीवर दीपकने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सलमान खान, सोनू सूद यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करत त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना बँक खाते क्रमांक ही दिला आहे.

दीपक ठाकुर याचे घर पुराच्या पाण्यात बुडाले आहे. ठाकूर याने पाण्यात वेढलेल्या गावाचा फोटो शेअर करत तेथील परिस्थिती दाखवली आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गावातील एक ही घर पुरापासून बचावले नसल्याचे दिसत आहे. प्रत्येक घरात पाणी घुसले आहे.

गंडक नदीला आलेल्या या महापुराची तीव्रता वाढतच आहे. गावातील घरे उंच भागात असूनही पुराची स्थिती भयानक असल्याने गावात पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे दीपक ठाकुरच्या घरातही पाणी शिरल्याने आपल्या आईवडिलांसह शहरात आश्रय घेतलाय. पुराची परिस्थिती बिकट होत असल्याने दीपक यांनी प्रशासनाला पूरग्रस्तांना मदत करण्याची मागणी केली.

दिपकने पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांनाही केले आहे. आमचं सगळे काही उदध्वस्त झाले आहे. काही उरले नाही. ग्रामस्थ अन्नाच्या एक कणासाठी तरसत आहेत. मी एकटा काही करू शकत नाही, तुम्हीही मदत करा, असे आवाहन ठाकूरने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.