नवी दिल्ली - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी-शाहच्या तोंडी जर्मनीचा हुकूमशाह हिटलरची भाषा आहे, असे बघेल म्हणाले. बघेल यांनी मोदी आणि शाह यांचे नाव न घेता, अप्रत्यक्षपणे मोटा भाई आणि छोटा भाई, असा उल्लेख करत टीका केली.
-
Chhattisgarh Chief Minister & Congress leader Bhupesh Baghel: Hitler had said during one of his speeches "abuse me all you want but don't abuse Germany", Mota Bhai & Chhota Bhai are also saying the same thing, speaking the same language. (23.01.20) pic.twitter.com/GMIWALYxQz
— ANI (@ANI) 23 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Chhattisgarh Chief Minister & Congress leader Bhupesh Baghel: Hitler had said during one of his speeches "abuse me all you want but don't abuse Germany", Mota Bhai & Chhota Bhai are also saying the same thing, speaking the same language. (23.01.20) pic.twitter.com/GMIWALYxQz
— ANI (@ANI) 23 January 2020Chhattisgarh Chief Minister & Congress leader Bhupesh Baghel: Hitler had said during one of his speeches "abuse me all you want but don't abuse Germany", Mota Bhai & Chhota Bhai are also saying the same thing, speaking the same language. (23.01.20) pic.twitter.com/GMIWALYxQz
— ANI (@ANI) 23 January 2020
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना हिटलरशी केली आहे, 'मला हव्या तेवढ्या शिव्या द्या, पण जर्मनीला शिवी देऊ नका, असे हिटलर आपल्या भाषणामध्ये म्हणायचा. सध्या मोटा भाई आणि छोटा भाई (मोदी आणि शाह) त्याच प्रकारची भाषा बोलतात, असे बघेल म्हणाले.
हेही वाचा - सुपरस्टार रजनीकांत यांच्याविरोधीतील तक्रार मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली
यापूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना राजीव गांधी पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी असल्याचे वक्तव्य केले होती. त्यावरून भूपेश बघेल यांनी मोदींवर टीका केली होती. मोदी दिवसभरात फक्त ३ ते ४ तासांची झोप घेतात. जे पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. राजीव गांधीजी अनेक वर्षांपूर्वीच हे जग सोडून गेले. निवडणुका सुरू असताना त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उद्गार काढणे हे मानसिक संतुलन ढासळल्याचे लक्षण आहे, असे बघेल पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
हेही वाचा - दिल्लीत निवडणूक आयोगाकडून १ कोटीची रोकड जप्त