नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जामा मशिद परिसरात आंदोलन करत असताना दिल्ली पोलिसांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना ताब्यात घेतले आहे. जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दिल्ली पोलिसांनी त्यांना शहरामध्ये आंदोलन करण्यास मज्जाव केला होता, मात्र, तरीही गुंगारा देत आझाद जामा मशिदीमध्ये पोहोचले होते.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेण्यासाठी आपल्याला त्याग करावा लागेल. आमचा हिंसेला पाठिंबा नाही. शुक्रवारपासून आम्ही मशिदीमध्ये बसलेलो आहे. तसेच आमच्या बरोबरचे कार्यकर्ते कोणत्याही प्रकारच्या हिंसेमध्ये सहभागी झाले नाहीत, असे आझाद यांनी सांगितले.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विविध पक्षांकडून तसेच, संघटनांकडून मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, ठिकठिकाणी संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली होती. तसेच, दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट, फोन कॉल आणि एसएमएस सेवाही ठप्प करण्यात आली होती.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात - भीम आर्मी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. जामा मशिद परिसरात आंदोलन करत असताना दिल्ली पोलिसांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील जामा मशिद परिसरात आंदोलन करत असताना दिल्ली पोलिसांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना ताब्यात घेतले आहे. जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दिल्ली पोलिसांनी त्यांना शहरामध्ये आंदोलन करण्यास मज्जाव केला होता, मात्र, तरीही गुंगारा देत आझाद जामा मशिदीमध्ये पोहोचले होते.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेण्यासाठी आपल्याला त्याग करावा लागेल. आमचा हिंसेला पाठिंबा नाही. शुक्रवारपासून आम्ही मशिदीमध्ये बसलेलो आहे. तसेच आमच्या बरोबरचे कार्यकर्ते कोणत्याही प्रकारच्या हिंसेमध्ये सहभागी झाले नाहीत, असे आझाद यांनी सांगितले.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विविध पक्षांकडून तसेच, संघटनांकडून मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव, ठिकठिकाणी संचारबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली होती. तसेच, दिल्लीच्या काही भागातील इंटरनेट, फोन कॉल आणि एसएमएस सेवाही ठप्प करण्यात आली होती.
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
नवी दिल्ली- नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे. जामा मशिद परिसरात आंदोलन करत असताना दिल्ली पोलिसांनी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना ताब्यात घेतले आहे. जामा मशिदीबाहेर मोठ्य़ा संख्येने आंदोलक जमले होते, त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दिल्ली पोलिसांनी त्यांना शहरामध्ये आंदोलन करण्यास मज्जाव केला होता, मात्र, तरीही गुंगारा देत आझाद जामा मशिदीमध्ये पोहचले होते.