ETV Bharat / bharat

LIVE : भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; विविध संघटना रस्त्यावर - कामगार भारत बंद

केंद्र सरकारच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील कामगार संघटनांनी आज (बुधवार) बंद पुकारला आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Bharat Bandh today 25 Crore workers may participate in protest
आज भारत बंद! 25 कोटी कामगार होणार सहभागी..
author img

By

Published : Jan 8, 2020, 1:32 AM IST

Updated : Jan 8, 2020, 3:17 PM IST

मुंबई - केंद्र सरकारच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील कामगार संघटनांनी आज (बुधवार) बंद पुकारला आहे. या भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या संघटनांची संख्या पाहता आज साधारणपणे 25 कोटी कामगार संपावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • LIVE update
  • 2:58 PM नाशिक -
    नाशिकहून प्रतिनिधी कपिल भास्कर यांचा भारत बंदचा आढावा...
  • 230 PM ठाणे- वाहतूक सुरळीत सुरू, बंदचा परिणाम नाही.
    ठाण्यातून प्रतिनिधी मनोज देवकर यांचा भारत बंदचा आढावा...
  • 2:15 PM परभणी - रास्ता रोको आंदोलन
    परभणीहून भारत बंदचा आढावा...
  • 2:12 PM अहमदनगर - विविध संघटना रस्त्यावर
    अहमदनगरहून भारत बंदचा आढावा...
  • 2:10 PM मुंबई - एटीएम सेवा बंद
    मंबईहून प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांचा भारत बंदचा आढावा...
  • 2:02 PM सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
    सांगलीहून प्रतिनिधी सर्फराज सनदी यांचा भारत बंदचा आढावा...
  • 1:15 PM रत्नागिरी- येथील सरकारी कर्मचारी भारत बंदला समर्थन देत रस्त्यावर उतरले आहेत. पोस्टल कर्मचारी ग्रुप - सी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून घोषणा देत आंदोलन केले.
    रत्नागिरीहून प्रतिनिधी राकेश गुडेकर यांचा भारत बंदचा आढावा...
  • 1:10 PM रायगड - जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी भारत बंदमध्ये सहभागी झाले आहेत.
    रायगडहून प्रतिनिधी राजेश भोस्टेकर यांचा भारत बंदचा आढावा...
  • 1: 05 PM पवई - भारत बंदला समर्थन देत पूर्व उपनगरात पवई येथे डाव्या संघटनेमार्फत निदर्शने करण्यात येत आहे.
    मुंबईहून प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांचा भारत बंदचा आढावा...
  • 12:10 PM ठाणे- जिल्ह्यातील मुरबाड येथील महाराष्ट्र इंजिनियरींग उद्योग कामगार संघटनेच्या कामगारांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी मोदी सरकार चले जावच्या घोषणा देऊन आंदोलनाला सुरुवात केली. शहापूरमधील मुंबई-नाशिक महामार्गावर दुपारच्या सुमारास रस्ता रोको करणार असल्याची माहिती कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.
    ठाणे
  • 12:07 PM मुंबई- आझाद मैदानावर भारतीय कामगार सेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. मुंबई कोटक महिंद्रा बँक, इंडस बँक या खासगी बँकेतील कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे.
    मुंबईहून प्रतिनिधी महेश बागल यांचा भारत बंदचा आढावा...
  • 12:05 PM पुणे- शहरात बंदचा कुठलाही परिणाम दुपारी बारापर्यंत तरी जाणवला नाही. पुण्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्ता, टिळक रस्त्यावरील दुकाने नेहमीप्रमाणे सुरू आहेत. तसेच शहरातील अन्य सर्व दुकाने, रिक्षा, पीएमपी ही वाहतूक सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय देखील नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
    पूण्याहून प्रतिनिधी किरण शिंदे यांचा भारत बंदचा आढावा...
  • 11: 50 AM कोल्हापूर- बंदला पाठिंबा दर्शवत कर्मचारी मोठ्या संख्येने टाऊन हॉलमध्ये एकत्र झाले आहेत. थोड्याच वेळात सहभागी झालेल्या सर्व कामगार संघटनांच्या मोर्चाला सुरुवात होणार असून बिंदू चौकात मोर्चाची सांगता होणार आहे.
    कोल्हापूरहून प्रतिनिधी शेखर पाटील यांचा भारत बंदचा आढावा...
  • 11:45 AM औरंगाबाद - येथील विविध संघटना संपात सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये कामगार संघटना, बँक कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना, घाटी रुग्णालयातील परिचारिका देखील या संपात सहभागी होणार असल्याने घाटी रुग्णालयातील काही शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.

    औरंगाबादहून प्रतिनिधी अमित फुटाने यांचा भारत बंदचा आढावा...
  • 11:30 AM मुंबई - दादरमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत बंदचा काही परिणाम दिसून आला नाही. जनजीवन सुरळीत सुरू आहे. दादरमध्ये दुपारनंतर निदर्शने सुरू होणार आहेत, अशी महिती मिळत आहे. या निदर्शनासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 10:57AM मुंबई - भारत बंदमध्ये शिवसेनेने सुद्धा आपला सहभाग नोंदवला आहे. मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मात्र, बंदचा जनजीवनावर काही विशेष परिणाम दिसून येत नाही. मुंबईतील रेल्वे वाहतूक, बेस्ट बस सेवा व इतर वाहतुकीची साधनेही नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
    मुंबईहून प्रतिनिधी अल्पेश करकरे यांचा भारत बंदचा आढावा...
  • 10:30 कोल्हापूर- शहरात बंदला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. शाळा, महाविद्यालये सुरळीत चालू आहेत. शहरातील बाजारपेठा देखील सुरू झाल्या आहेत.

  • 10;00 AM मुंबई - सकाळी 9 वाजेपर्यंत बंदला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. रस्ते वाहतूक, लोकल सेवा, चाकरमान्यांची रेलचेल रस्त्यावर दिसून येत आहे.
    मुंबईहून प्रतिनिधी अनुभव भागवत यांचा भारत बंदचा आढावा...
  • 9:10 AM अमरावती- भारत बंदमध्ये सहभाग नोंदवत येथील सायन्य चौकातील मैदानातून दुपारी एक वाजता मार्चा काढण्यात येणार आहे. सकाळपर्यंत बंदचे पडसात शहरात दिसून आले नाहीत. मात्र, दुपारनंतर पडसाद दिसण्याची शक्यता आहे.
    अमरावतीहून प्रतिनिधी शशांक लवारे यांचा भारत बंदचा आढावा...

काय आहे प्रकरण..

2 जानेवारी 2020ला कामगार मंत्रालयाने बैठक बोलावली होती. यामध्ये कामगार संघटनांना ज्या गोष्टींचे आश्वासन देण्यात आले होते, त्यामधील एकही गोष्ट सरकारने मान्य केली नाही. सरकारचे एकूण धोरण हे कामगार विरोधी आणि जनतेविरोधी आहे. त्यामुळे, हा बंद पुकारला असल्याचे या कामगार संघटनांनी आपल्या पत्रकामधून स्पष्ट केले आहे.

सर्वच सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे सुरू आहे. देशातील 12 विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले असून, एअर इंडियाही विकण्याच्या तयारीत सरकार आहे. तसेच, बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील कर्मचाऱ्यांना बळजबरी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले. रेल्वे आणि युद्धसामग्री बनवणारे कारखानेही हळूहळू खासगीकरणाच्या दिशेने जात आहेत. या सर्व गोष्टींचा विरोध या कामगार संघटना करत आहेत.

कोणकोणत्या संघटना सहभागी?

आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएस, सीआयटीयू, एआयटीयूसी, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी या मुख्य कामगार संघटनांसह कित्येक प्रादेशिक संघटना या संपामध्ये सहभागी असणार आहेत. तर, शिवसेनेची कामगार संघटना, देशभरातील 60 विद्यार्थी संघटना, शिक्षक-प्राध्यापक संघटना हेदेखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थी आणि प्राध्यापक संघटना या आपापल्या मागण्यांसाठी या बंदमध्ये सहभागी होतील. तसेच, देशभरातील 175 शेतकरी संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे.

बँकांचाही समावेश..

ऑल इंडिया बँक एम्लॉई असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए), बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी आणि बँक कर्मचारी सेना महासंघ या संघटनाही बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज बँकांचे व्यवहार ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, एसबीआयने असे म्हटले आहे, की या बंदचा बँकेच्या व्यवहारावर फारसा परिणाम होणार नाही, कारण बंदमध्ये सहभागी असणाऱ्या संघटनांमध्ये बँकमधील अत्यंत थोडे असे कर्मचारी आहेत. बँकांमधील व्यवहार थांबल्यामुळे आज आणि उद्या (गुरूवार) एटीएम व्यवहारांवर ताण येण्याची शक्यता आहे.

राज्यातील शाळा बंद राहण्याची शक्यता..

या संपात राज्यातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसोबत शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारे शिक्षक हे सहभागी होणार असल्याने मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी राज्यातील तब्बल १६ लाख सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक हे सहभागी होणार असल्याची माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

तर, मुंबई, ठाण्यातील अनुदानित आणि महापालिका शाळांसोबत ठाणेसह कोकणातील संपात सहभागी न होता, काळ्या फिती लावून या कामावर हजर राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी दिली. दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही या संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून निषेध करून आपले कामकाज सुरू ठेवणार असून राज्यातील मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनाही यासाठी संघटनेकडून आवाहन करण्यात आले असल्याची माहिती घागस यांनी दिली.

हेही वाचा : "8 जानेवारीच्या देशव्यापी संपात शिक्षकांसह प्राध्यापकही होणार सामील, शाळा राहणार बंद"

Intro:Body:

आज भारत बंद! 25 कोटी कामगार होणार सहभागी..

मुंबई - केंद्र सरकारच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून, देशभरातील कामगार संघटनांनी आज (बुधवार) बंद पुकारला आहे. या भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या संघटनांची संख्या पाहता, आज साधारणपणे 25 कोटी कामगार संपावर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण..

2 जानेवारी 2020ला कामगार मंत्रालयाने बैठक बोलावली होती. यामध्ये कामगार संघटनांना ज्या गोष्टींचे आश्वासन देण्यात आले होते, त्यामधील एकही गोष्ट सरकारने मान्य केली नाही. सरकारचे एकूण धोरण हे कामगार विरोधी आणि जनतेविरोधी आहे. त्यामुळे, हा बंद पुकारला असल्याचे या कामगार संघटनांनी आपल्या पत्रकामधून स्पष्ट केले आहे.

सर्वच सरकारी संस्थांचे खासगीकरण करणे सुरू आहे. देशातील 12 विमानतळांचे खासगीकरण करण्यात आले असून, एअर इंडियाही विकण्याच्या तयारीत सरकार आहे. तसेच, बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील कर्मचाऱ्यांना बळजबरी स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले. रेल्वे आणि युद्धसामग्री बनवणारे कारखानेही हळूहळू खासगीकरणाच्या दिशेने जात आहेत. या सर्व गोष्टींचा विरोध या कामगार संघटना करत आहेत.

कोणकोणत्या संघटना सहभागी?

आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएस, सीआयटीयू, एआयटीयूसी, टीयूसीसी, एसईडब्ल्यूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी या मुख्य कामगार संघटनांसह कित्येक प्रादेशिक संघटना या संपामध्ये सहभागी असणार आहेत. तर, शिवसेनेची कामगार संघटना, देशभरातील 60 विद्यार्थी संघटना, शिक्षक-प्राध्यापक संघटना हेदेखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. विद्यार्थी आणि प्राध्यापक संघटना या आपापल्या मागण्यांसाठी या बंदमध्ये सहभागी होतील. तसेच, देशभरातील 175 शेतकरी संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे.

बँकांचाही समावेश..

ऑल इंडिया बँक एम्लॉई असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए), बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी आणि बँक कर्मचारी सेना महासंघ या संघटनाही बंदमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे आज बँकांचे व्यवहार ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, एसबीआयने असे म्हटले आहे, की या बंदचा बँकेच्या व्यवहारावर फारसा परिणाम होणार नाही, कारण बंदमध्ये सहभागी असणाऱ्या संघटनांमध्ये बँकमधील अत्यंत थोडे असे कर्मचारी आहेत. बँकांमधील व्यवहार थांबल्यामुळे आज आणि उद्या (गुरूवार) एटीएम व्यवहारांवर ताण येण्याची शक्यता आहे.

राज्यातील  शाळा बंद राहण्याची शक्यता..

या संपात राज्यातील कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसोबत शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारे शिक्षक हे सहभागी होणार असल्याने मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी राज्यातील तब्बल १६ लाख सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक हे सहभागी होणार असल्याची माहिती 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

तर, मुंबई, ठाण्यातील अनुदानित आणि महापालिका शाळांसोबत ठाणेसह कोकणातील संपात सहभागी न होता, काळ्या फिती लावून या कामावर हजर राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी दिली. दहावी-बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आम्ही या संपात सहभागी न होता काळ्या फिती लावून निषेध करून आपले कामकाज सुरू ठेवणार असून राज्यातील मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनाही यासाठी संघटनेकडून आवाहन करण्यात आले असल्याची माहिती घागस यांनी दिली.

Conclusion:
Last Updated : Jan 8, 2020, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.