ETV Bharat / bharat

बंगळुरू हिंसाचार : समाजमाध्यमांचा वापर जबाबदारीने करा, के. टी. रामाराव यांचे आवाहन

बंगळुरूमध्ये झालेला हिंसाचार तुम्हाला हेच दाखवून देतो, की सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवणे किती धोकादायक आहे. त्यामुळे समाजमाध्यम वापरणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो, की तुम्ही जबाबदारीने वागा असे ते म्हणाले...

Bengaluru violence: K. T. Rama Rao urges social media users to be responsible
बंगळुरू हिंसाचार : सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा, के. टी. रामाराव यांचे आवाहन
author img

By

Published : Aug 12, 2020, 6:03 PM IST

हैदराबाद : तेलंगाणाचे औद्योगिक मंत्री के. टी. रामाराव यांनी बंगळुरूमधील हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. समाजमाध्यमांचा वापर करताना लोकांनी जबाबदारीने वागले पाहिजे, असे ते म्हणाले. बंगळुरूमध्ये एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. त्याबाबत रामाराव यांनी ट्विट केले आहे.

बंगळुरूमध्ये झालेला हिंसाचार तुम्हाला हेच दाखवून देतो, की सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवणे किती धोकादायक आहे. त्यामुळे समाजमाध्यम वापरणाऱ्या सर्वांना मी विनंती करतो, की तुम्ही जबाबदारीने वागा. कोणत्याही प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्यासाठी किंवा अपप्रचारासाठी याचा वापर करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

एका काँग्रेस नेत्याच्या नातेवाईकाने केलेल्या फेसबुक पोस्टमुळे बंगळुरूमध्ये वाद निर्माण झाला होता. या वादाचे स्वरूप मंगळवारी रात्री हिंसाचारात झाले. या हिंसाचारात तीन लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर तब्बल ६० पोलीस कर्मचारी जखमी झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.