ETV Bharat / bharat

कोरोनापूर्वी या महामाऱ्यांनी हादरवले होते जगाला... - प्लेग

इतिहासात जेव्हा वैद्यकीय सुविधा नव्हत्या, तेव्हा आपण अशा महामारीविरूद्धच्या युद्धांमध्ये कसा विजय मिळवला? ज्या विषाणू आणि बॅक्टेरियांनी अनेक जीव, उपजीव आणि देशांना नष्ट केले, त्यांच्यासमोर आपण कसे तग धरू शकलो? काही सर्वाधिक क्रूर अशा रोगजनकांचा विनाश कसा झाला? पृथ्वीवरून ते कायमचे नाहीसे कसे झाले?

Before coronavirus, pandemics that shook the world
कोरोनापूर्वी या महामाऱ्यांनी हादरवले होते जगाला...
author img

By

Published : Apr 9, 2020, 7:33 PM IST

Updated : Apr 10, 2020, 5:51 PM IST

आधुनिक मानव, जो वैद्यकीय क्रांतिचे लाभ उपभोगत आहे, आता कोविड-१९ मुळे असहाय्यपणे तडफडत आहे. आपल्याकडे सर्वोत्कृष्ट औषधे, डॉक्टर्स आणि लस असूनही; हा विषाणू अनियंत्रित झाला आहे. संपूर्ण जगभरात हजारो लोक दररोज मृत्युमुखी पडत आहेत. इतिहासात जेव्हा वैद्यकीय सुविधा नव्हत्या, तेव्हा आपण अशा महामारीविरूद्धच्या युद्धांमध्ये कसा विजय मिळवला? ज्या विषाणू आणि बॅक्टेरियांनी अनेक जीव, उपजीव आणि देशांना नष्ट केले, त्यांच्यासमोर आपण कसे तग धरू शकलो? काही सर्वाधिक क्रूर अशा रोगजनकांचा विनाश कसा झाला? पृथ्वीवरून ते कायमचे नाहीसे कसे झाले?

  • मानवी इतिहासात प्लेग हा सर्वाधिक भयानक आजार आहे. पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टंटिनोपॉलमध्ये तो प्रथम इसवी सन ५४१ मध्ये अवतीर्ण झाला. हा आजार भूमध्य समुद्राच्या माध्यमातून संपूर्ण इजिप्तमधून पसरला होता. बायझंटाईन साम्राज्याला विशेषतः कॉन्स्टंटिनोपॉलला प्रचंड हादरा दिल्यानंतर तो युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियात पसरला. असा अंदाज आहे की प्लेगचे औषध नसल्याने तेव्हा ३ ते ५ कोटी लोकांचे बळी गेले होते. इसवी सन ५४१ ते ७५० या काळात त्याने अनेक राष्ट्रांना संकटात ढकलले आणि हळूहळू तो नष्ट झाला. इतिहासकारांचा विश्वास आहे की केवळ उच्च प्रतिकारशक्ती असलेले लोकच त्यावेळी जिवंत राहू शकले. त्यावेळी बायझंटाईन साम्राज्याचा राजा जस्टिनियन याच्या नावाने प्लेग ऑफ जस्टिनियन असे त्याचे नामकरण करण्यात आले.
  • येर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरिया हा जस्टिनियन प्लेगला जबाबदार होता आणि तो ८०० वर्षांनी पुन्हा अवतरला. यावेळी तो ब्युबॉनिक प्लेगच्या स्वरूपात आला ज्याला काळा मृत्यु असे म्हटले गेले आणि तो इसवी सन १३४७ मध्ये संपूर्ण युरोपभर पसरला. या नव्या प्लेगने अवघ्या ४ वर्षांमध्ये कोट्यवधी लोकांचे बळी घेतले. उपचारांची जाणीव नसलेल्या लोकांना लवकरच तो संसर्ग झालेल्या व्यक्तिच्या थेट संपर्कात आल्यावर तो पसरतो, असा शोध लागला. त्याच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी, संसर्गग्रस्त लोकांना हद्दपार करण्यात आले. रोमन बंदरांवर राज्यकर्त्यांनी निर्बंध लादले. खलाशांना ४० दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जायचे आणि जेव्हा कोणतीही लक्षणे दिसत नसतील तरच त्यांना साम्राज्यात प्रवेश करण्यास परवानगी दिली जायची.
  • युरोपातून ब्युबॉनिक प्लेग तात्पुरत्या कालावधीसाठी गायब झाला. तरीही, १३४७ ते १६६६ या काळात तो प्रत्येक २० वर्षांनी आपली उपस्थिती हमखास नोंदवायचा. प्रत्येक वेळेला तो परतला की लाखो लोकांना त्याने मारले आहे. ३०० वर्षांच्या कालावधीत तो ४० वेळा परतला. इसवी सन १६६५ मध्ये, त्याने इंग्लंडला धडक देत लंडनमध्ये ७५,००० लोकांना ठार मारले. सरकारने अत्यंत त्यावर अत्यंत कठोर कार्यवाही केली. अधिकाऱ्यांना प्लेगच्या रूग्णांना अलग करण्याचा आदेश देऊन, त्या रुग्णांची घरे सील करण्यास सांगण्यात आले. लोकांना बाहेर न पडण्याचे कडक इशारे देण्यात आले.

तेव्हा पहिल्यांदाच लोकांना क्वारंटाईन करण्याचा प्रकार समोर आला होता. लोकांच्या घरामागील अंगणांमध्येच त्यांचे मृतदेह पुरण्यात आले. त्यावेळी आजाराचा सामना करण्यासाठी दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नसल्याचे दिसले. जेव्हा अधिकाऱ्यांना प्लेगच्या खुणा आढळायच्या, तेव्हा लोकांना स्वतःहून विलगीकरण कक्षात जाण्यास सांगितले जायचे.

  • युरोप, आशिया आणि अरब देशांमध्ये देवी (स्मॉलपॉक्स) नेहमी आढळणारा आजार होता. प्रत्येक १० लोकांमध्ये, ३ मृत्युमुखी पडत असत आणि उरलेल्या ७ जणांवर त्याचे अत्यंत तीव्र असे नंतरचे परिणाम रहात असत. १५ व्या शतकात, देवीची साथ अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये युरोपियन प्रवाशांच्या माध्यमातून पसरली. कोट्यवधी लोकांना देवीच्या विरोधात प्रतिकारशक्ती नसल्याने आपले जीव गमवावे लागले. त्यानंतर अनेक वर्षांनी इसवी सन १७९६ मध्ये, देवीच्या रोगावर एडवर्ड जेन्नर या डॉक्टरने लस शोधली. १९८० मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराचे जागतिक निर्मूलन झाल्याचे प्रमाणित केले. अत्यंत खर्चिक अशा देवी निर्मूलन कार्यक्रमातून हे साध्य करण्यात आले.
  • पहिल्या जागतिक महायुद्धानंतर स्पॅनिश फ्ल्यू स्पेनमध्ये १९१८ मध्ये सुरू झाला. तो सर्व देशांमध्ये झपाट्याने पसरला आणि त्याने जगभरात ५ कोटी बळी घेतले. भारतातही लाखो लोक मरण पावले. त्याच्या उद्रेकांनंतर तो २ वर्षांनी नाहीसा झाला. काहींच्या मते फ्ल्यूवर डॉक्टरांनी प्रभावी उपचार केल्याने तो गेला, तर इतरांच्या मते रोगनाशक विषाणुंचे काही काळानंतर नाहीसे होणे हे नेहमीचे आहे.
  • संपूर्ण १९ व्या शतकात कॉलराने जगाला यातना दिल्या आणि लाखो लोकांना ठार मारले. सुरूवातीला, तो हवेतून पसरला जातो, असे मानले जात असे. परंतु डॉक्टर जॉन स्नो याला बॅक्टेरिया पाण्यामार्फत पसरला जात असावा, असा संशय होता. त्यानुसार त्याने संशोधन सुरू केले आणि अखेरीस तो निष्कर्षापर्यंत पोहचला. लंडनच्या एका पाण्याच्या पंपाभोवतालच्या ५०० लोकांना त्याचा संसर्ग झाल्याचे आढळले. कॉलरा हा दूषित पाण्यातून पसरतो, असा शोध लागला. खरेतर, व्हायब्रियो कॉलरा बॅक्टेरियममुळे कॉलरा होतो जो पाण्याच्या साठ्यात आसरा घेतो. बॅक्टेरियाने या आजाराचा प्रसार होतो, याची जाणीव जरी स्नोला नसली तरीही, त्याने स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाण्याचा पंप हटवला. त्यामुळे कॉलराच्या प्रसाराला आळा बसला. स्नोच्या प्रयत्नांनी कॉलराचे संपूर्ण उच्चाटन झाले नसले तरीही, जगाने आपला भोवताल आणि स्वच्छता याकडे कठोरपणे पहाण्यास सुरूवात केली. स्वच्छता वाढवल्यास, कॉलराचा प्रसार नियंत्रित करता येऊ शकतो.

हेही वाचा : कोरोना आणिबाणी हाताळण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी केले मंजूर

Last Updated : Apr 10, 2020, 5:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.