ETV Bharat / bharat

बस्तर पोलिसांचे 'लोन वर्राटू' अभियान यशस्वी, दंतेवाड्यात 65 हून अधिक नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

बस्तर पोलिसांनी सुरू केलेले लोन वर्राटू अभियान यशस्वी होत आहे. या अभियानांतर्गत दंतेवाडा जिल्ह्यातील 65 पेक्षा जास्त इनामी नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

police
police
author img

By

Published : Jul 26, 2020, 6:15 PM IST

दंतेवाडा (छत्तीसगड) - जिल्ह्यातील चिकपाल गावात सुरू झालेल्या वर्राटू अभियानास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वीस दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत 65 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यातील अनेक नक्षल्यांवर लाखो रुपयांचे बक्षिस पोलिसांनी घोषित केले होते. पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत ते सामाजातील मुख्य प्रवाहात जोडले जात आहेत.

'लोन वर्राटू' अभियान होत आहे यशस्वी

बस्तर मधील स्थानीय कैडरच्या नक्षलवाद्यांना सामाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस सतत प्रयत्न करत आहे. लोन वर्राटू याचा अर्थ घर परत या, असा होतो. यामुळे पोलिसांनी हे अभियान सुरू केले आहे. याचा प्रचार पोलिसांकडून गावागावांत करण्यात येत आहे. ज्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायचे आहे, त्यांसाठी प्रत्येक गावात पोलीस अधिकाऱ्यांचे दुरध्वनी क्रमांकही देण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अनेक स्थानिक नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत.

नक्षलवाद्यांना रोजगार व जीवनोपयोगी सुविधा

आत्मसमर्ण करणाऱ्या नक्षवाद्यांना रोजगार व जीवनोपयोगी सुविधाही देण्यात येत आहे. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहिती नुसार, जिल्हा पोलीस व प्रशासन आता आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी रोजगार मिळवून देण्याचे काम करत आहे. आतापर्यंत आत्मसमर्पण केलेल्या नक्षवाद्यांना केवळ पोलीस दलातच नोकरी मिळत होती. पण, आता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील रोहगार उपलब्ध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 8 जुलैला आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांने शेतीसाठी ट्रॅक्टर मागितला होता. त्यानंतर प्रशासनाने त्याला ट्रॅक्टर उपलब्ध करुन दिला. त्याचबरोबर पोलिसांनी जाहीर केले आहे की, ज्या गावातून दहापेक्षा अधिक नक्षलवादी आत्मसमर्पण करतील त्यांना कृषी उपकरणे व ट्रॅक्टर देण्यात येईल, जेणे करुन ते आपल्या गावातच शेती करतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.