हैदराबाद – जगभरात 10 ऑगस्ट हा जागतिक सिंह दिन म्हणून साजरा करण्यात येतो. जंगलचा राजा म्हणून ओळख असलेल्या सिंहाची संख्या पृथ्वीवर 30 हजार ते 1 लाखांपर्यत शिल्लक राहिली आहे . गेल्या चार दशकांमध्ये सिंहाची संख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे.
गुजरातच्या गीर जंगलात आशियाई सिंहाचे प्रमाण हे पाच वर्षात 29 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या पाच वर्षात सिंहाचे प्रमाण हे 523 वरून 674 झाले आहे. तर 2015 सिंहाचे क्षेत्र हे 22 हजार स्क्वेअर किलोमीटर होते. तर हे प्रमाण वाढून 2020 मध्ये 30 हजार स्क्वेअर किलोमीटर झाले आहे.
- आशियाई सिंह हे संरक्षित क्षेत्रात आढळतात. यामध्ये गुजरातच्या नऊ जिल्ह्यांसह सौराष्ट्राचा समावेश आहे.
- गेल्या 100 वर्षात सिंहाचे प्रमाण हे 80 टक्क्यांनी कमी झाले आहे.
- सिंह हे 27 आफ्रिकन देशांमध्ये आढळतात. तर आशियामध्ये फक्त भारतात सिंह आढळलात. सात देशांमध्ये 1 हजारांहून अधिक सिंह आहेत. तर 26 आफ्रिकन देशांमधून सिंह नामशेष झाले आहेत.
- मानवाने केलेल्या अतिक्रमणामुळे सिंहासह जंगली प्राण्यांचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे सिंह आणि मानवामध्ये संघर्ष होत असल्याच्या घटना जंगलानजीकच्या ठिकाणी घडतात. शिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडल्याने त्यांचे मृत्यू झाल्याच्या अनेकदा घटना घडल्या आहेत.
- सिंहाच्या अधिवासाचे क्षेत्र नष्ट होत असल्याने त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.
- सिंहाची बेकायदेशी शिकार करून त्यांच्या अवयवांची स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी केली जाते. त्यांचा उपयोग पारंपारिक औषधांसाठी केला जातो.
- आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धनाच्या यादीत धोका निर्माण झालेल्या प्रजातींमध्ये सिंहाचा समावेश करण्यात आला आहे.
सिंहाच्या संवर्धनाचे प्रयत्न
- सिंहाचा 1975 पासून सीआयटीईएस अपेडिंक्स -2 मध्ये समावेश केला आहे. तर आशियाई सिंहांना धोका निर्माण जाल्याने सीआयटीईस अपेडिंक्स-2 मध्ये समावेश केला आहे. आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात सिंहाची संख्या आहे. त्यांचे संरक्षित क्षेत्रात चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यात येते. आफ्रिकेच्या पूर्व आणि दक्षिण भागात वन्यजीव अभयारण्य पर्यटनाचा विस्तार झाला आहे. त्यामधून अभयारण्य व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवर महसूल मिळत आहे. त्यामधून वन्यजीवांच्या संसवर्धनाला मोठे प्रोत्साहन मिळत आहे.
- सिंहाच्या संवर्धनासाठी प्रादेशिक रणनीती पश्चिम आणि केंद्रीय आफ्रिकेत विकसित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रीय आणि समाजासाठी समान प्राधान्यक्रमासाठी कृती कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यामधून सिंहाची राहण्याची स्थिती आणि व्यवस्थापनात लक्षणीय सुधारणा होणार आहे. या प्रादेशिक रणनीतीचा वापर अनेक देशांनी सिंहाच्या संवर्धनासाठी कृती कार्यक्रमात वापर केला आहे.