गुवाहाटी - सांस्कृतिक कार्यक्रमात प्रेक्षकांकडून महिला नर्तिकांबाबत गैरवर्तन घडल्याची घटना समोर आली आहे. नर्तिकांच्या समूहाला प्रेक्षकांनी कपडे काढण्यास प्रवत्त केले. हा धक्कादायक प्रकार बोको येथील शेगॉन भागात घडला आहे.
ईदनंतर आनंद साजरा करण्यासाठी आसाममधील शेगॉनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या नर्तिका या बिहू हे लोकनृत्य करण्यासाठी पोहोचल्या. मात्र शंभरहून अधिक प्रेक्षकांनी नृत्य सुरू असताना त्यांना कपडे उतरविण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा संपूर्ण बेरंग झाला.
आयोजकांनी चढ्या दराने कार्यक्रमाच्या तिकिटांची केली विक्री-
कार्यक्रमातील नर्तिका कपडे काढून नाचणार असल्याचे खोटे सांगत आयोजकांनी चढ्या दराने कार्यक्रमाच्या तिकिटांची विक्री केल्याचे बोलले जात आहे. तसेच त्या नर्तिका पश्चिम बंगालमधी कूच बिहार येथून येणार असल्याचे आयोजकांनी प्रेक्षकांना सांगितले होते. प्रेक्षकांचे विकृत वागणे पाहून महिला नर्तिकांनी तेथून कशीबशी सूटका केली. त्या नर्तिका जाताना त्यांच्या वाहनांवरही प्रेक्षकांनी दगडफेक केली. दरम्यान आसाममधील काही भागात 'स्ट्रीप डान्स' (कपडे उतरवून नृत्य करण्याचा प्रकार) लोकप्रिय आहे.