ETV Bharat / bharat

'भाजपच्या हलगर्जीपणामुळे पेहलू खान प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले' - BJP

राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी पेहलू खान प्रकरणावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

अशोक गेहलोत
author img

By

Published : Aug 18, 2019, 5:35 PM IST

नवी दिल्ली - राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी पेहलू खान प्रकरणावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. पेहलू खान झुंडबळी प्रकरणी तत्कालीन भाजप सरकारने केलेल्या हलगर्जीपणाची कल्पना ही करवत नाही. भाजपमुळेच आरोपी निर्दोष सुटेल, असे गेहलोत यांनी म्हटले आहे.

  • Rajasthan Chief Minister & Congress leader, Ashok Gehlot: Pehlu Khan case (2017 Alwar lynching) was discussed, the negligence by the earlier government cannot be imagined, that is why accused were given the benefit of doubt by the court and were acquitted. pic.twitter.com/ESIKNWsDnc

    — ANI (@ANI) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पेहलू खान झुंडबळी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची अलवर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयाचा फायदा देत आरोपींना निर्दोष ठरवत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. आरोपी निर्दोष सुटल्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राजस्थान सरकारने विशेष तपास पथकाची स्थापन केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी येत्या 15 दिवसांत अहवाल मागितला आहे.

काय प्रकरण -

पेहलू खान आणि दोन मुले १ एप्रिल २०१७ रोजी जयपूरमधून गायी घेऊन हरयाणातील आपल्या गावी निघाले होते. यावेळी अलवरमध्ये गोतस्करी करत असल्याच्या संशयातून त्यांना गोरक्षकांनी बेदम मारहाण केली होती. त्यात पेहलू खान यांचा ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. पेहलू खान झुंडबळी प्रकरणामुळे राजस्थानमधील तत्कालीन भाजप सरकारवर टीकेची झोड उठली होती. अलीकडे राजस्थान सरकारने झुंडबळी रोखण्यासाठी विधिमंडळात विधेयक मंजूर केले आहे.

Intro:Body:

mayuri NTNL

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.