ETV Bharat / bharat

'खरा हिंदू मैदान सोडून पळून जात नाही, अमित शाह मैदान सोडून पळाले' - दिल्ली विधासभा निवडणूक

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न केल्याने, शाह मैदान सोडून पळून जात आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

arvind kejriwal
अरविंद केजरीवाल
author img

By

Published : Feb 6, 2020, 7:08 PM IST

नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधला आहे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याचे आव्हान केजरीवाल यांनी शाह यांना केले होते. मात्र, भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न केल्याने, शाह मैदान सोडून पळून जात आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली. आज (गुरुवार) दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद
संबित पात्रा यांना मुख्यमंत्री केले तर..दोन दिवसांपूर्वी मी भाजपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याचे आव्हान केले होते. अमित शाह यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप दिल्लीत निवडणूक लढत आहे. त्यामुळे अमित शाह यांनी कधीही माझ्याशी वादविवाद करायला यावे. मात्र, यावरही भाजपकडून उत्तर आले नाही. जनता चेहरा पाहून मतदान करते. परंतु, भाजपने अजून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. जर भाजपने संबित पात्रा यांना मुख्यमंत्रीपदी बसवले तर? असा प्रश्न केजरीवाल यांनी केला.
खरा हिंदू मैदान सोडून पळून जात नाही
पुढे ते म्हणाले, की मी प्रत्येक मुद्द्यांवर अमित शाह यांच्याशी वादविवाद करायला तयार आहे. भाजप शाहीन बागचा आंदोलनाचा मुद्दा वारंवार काढत आहे, त्यावरही मी चर्चा करायला तयार आहे. गीतेमध्ये म्हटले आहे, मैदान सोडून पळून जाऊ नये. खरा हिंदू कधीही मैदान सोडून पळून जात नाही. मात्र, अमित शाह मैदान सोडून पळत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
नव्या राजकारणावर शिक्कामोर्तब करणारी निवडणूक
यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेल्या कामांचीही माहिती दिली. ही निवडणूक फक्त निवडणुकीपुरती नसून देशात नवे राजकारण सुरू झाले आहे, हे राजकारण कामाचे आहे. यावर शिक्कामोर्तब करणारी आहे. आम्ही शाळा आणि रुग्णालये तयार करत आहोत, तर भाजप दिल्लीला २०० वर्ष मागे घेऊन जात आहे, असा आरोप त्यांनी केला

Intro:Body:

'खरा हिंदू मैदान सोडून पळून जात नाही, अमित शाह मैदान सोडून पळाले'

नवी दिल्ली - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधला आहे. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याचे आव्हान केजरीवाल यांनी शाह यांना केले होते. मात्र, भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित न केल्याने, शाह मैदान सोडून पळून जात आहेत, अशी टीका केजरीवाल यांनी केली. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.

संबित पात्रा यांना मुख्यमंत्री केले तर..

दोन दिवसांपूर्वी मी भाजपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याचे आव्हान केले होते. अमित शाह यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप दिल्लीत निवडणूक लढत आहे.  त्यामुळे अमित शाह यांनी कधीही माझ्याशी वादविवाद करायला यावे. मात्र, यावरही भाजपकडून उत्तर आले नाही. जनता चेहरा पाहून मतदान करते. परंतु भाजपने अजून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. जर भाजपने संबित पात्रा यांना मुख्यमंत्री पदी बसवले तर? असा प्रश्न केजरीवाल यांनी केला.  

खरा हिंदू मैदान सोडून पळून जात नाही

केजरीवाल म्हणाले, मी प्रत्येक मुद्दय़ावर अमित शाह यांच्याशी वादविवाद करायला तयार आहे. भाजप शाहीन बागचा आंदोलनाचा मुद्दा वारंवार काढत आहे, त्यावरही मी चर्चा करायला तयार आहे. गीतेमध्ये म्हटले आहे, मैदान सोडून पळून जाऊ नये. खरा हिंदू कधीही मैदान सोडून पळून जात नाही. मात्र, अमित शाह मैदान सोडून पळत आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.  

नव्या राजकारणावर शिक्कामोर्तब करणारी निवडणूक

यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या कामांचीही माहिती दिली. ही निवडणूक फक्त निवडणूकीपुरती नसून देशात नवे राजकारण सुरू झाले आहे, हे राजकारण कामाचे राजकारण आहे. यावर शिक्कामोर्तब करणारी आहे. आम्ही शाळा आणि रुग्णालये तयार करत आहोत, तर भाजप दिल्लीला २०० वर्ष मागे घेऊन जात आहे, असा आरोप त्यांनी केला

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.