प्रतिकूल परिस्थिती आणि संकटाच्या काळातही, स्थिर आणि धैर्यशाली राहणे अत्यंत महत्वाचे आहे. दुर्दैवाच्या मुखवट्याच्या आड आमचा लाजाळूपणा हाच लैंगिक गुन्हे करणाऱ्यांना सक्षम करत असतो, असा मानसोपचार तज्ञांना विश्वास आहे.
हैदराबादच्या बाह्य भागात नुकताच एका तरुण महिलेवर झालेला पाशवी बलात्कार आणि खुनाची घटना गुन्हेगारांनी अत्यंत काळजीपूर्वक गुन्ह्याची योजना आखली, हेच दाखवते. धोका जाणवल्यावरही वेळेवर कृती करण्याची महिलेची असमर्थता बलात्कारी आरोपींच्या फायद्याची ठरल्याचे सिद्ध झाले आहे.
आरोपींनी तिची पंक्चर झालेली बाईक दुरुस्त करतो, असे म्हटल्यावर तिने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मानसोपचार तज्ज्ञ कल्याण चक्रवर्ती यांनी अशा परिस्थितीत सापडल्यास महिलांनी अधिक दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकारच्या भयंकर परिस्थितीत सापडल्यास महिलांनी काय करावे, याबद्दल काही सूचना...
- निर्मनुष्य प्रदेशात एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला मुद्दाम वेळ काढून मदत करत असेल तर तुम्ही ताबडतोब सतर्क झाले पाहिजे.
- तुम्ही लगेच सभोवतालच्या परिस्थितीची मनाशी नोंद करून जर काही संशयास्पद वाटले तर लगेचच त्या भागातून कसे निसटता येईल, याचे मार्ग शोधण्यास सुरुवात करा.
तुमचे नाव आणि पत्ता अशी वैयक्तिक माहिती कुणी काढून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर सावध राहिले पाहिजे.
- १०० पैकी ९९ लोक खरोखरच तुम्हाला मदत करण्याच्या स्वभावाचे असतील पण एक व्यक्ती गुन्हेगार असू शकते.
- आपल्याशी संवाद साधणारी व्यक्ती मद्यप्राशन करून आहे का, याचे निरीक्षण केले पाहिजे. जर तसे असेल तर, लगेच अशा लोकांपासून दूर जा.
- महिलांनी तिखट पावडर, पाण्याची बाटली, पेन आणि पेन्सिल आपल्या बॅगमध्ये सदासर्वकाळ ठेवली पाहिजे. अनपेक्षित धोक्याच्या प्रकरणात, स्वसंरक्षणासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. अशा हल्ल्याच्या वेळेस गुन्हा करणारा ठार झाला तरीही, तो गुन्हा समजला जात नाही.
- जर तुमचे वाहन मध्येच बंद पडले किंवा परिस्थितीमुळे त्यांना एकट्याने वाट पाहण्यास भाग पाडलेच तर. कुटुंबातील सदस्यांना ताबडतोब परिस्थितीची माहिती कळवणे आवश्यक आहे आणि तुमचे ठिकाण त्यांना लगेच कळवा.
- स्मार्ट फोन्समुळे आता ठिकाण शोधून काढणे सहज शक्य झाले आहे. पोलिस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर फोन करून या ठिकाणाची माहिती देता येते.
- विपरित परिस्थितीत, महिलांनी सक्रीय आणि ठाम राहिले पाहिजे. शत्रूला त्याने तुम्हाला इजा पोहचवण्याचा प्रयत्न केला तर काय परिणाम होतील, याची जाणीव करून दिली पाहिजे.
- कार्यालय किंवा महाविद्यालयाला रोज जाणे-येणे करताना जवळचे रस्ते घेण्यापेक्षा, नेहमीच्या सार्वजनिक रस्त्यांचा वापर केला पाहिजे.
- तुमची दुचाकी रस्त्याच्या मध्येच किंवा निर्मनुष्य भागात बंद पडली तर, तेथेच ती उभी करून ती जागा सोडून जाणे सुरक्षित आहे.