श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील आणखी दोन नेत्यांची काल (मंगळवार) सुटका करण्यात आली. यामध्ये एका माजी पीडीपी आमदार आणि एका कामगार नेत्याचा समावेश आहे. काश्मीरमध्ये अजूनही १६ मुख्य नेते कैदेत आहेत.
माजी पीडीपी आमदार अजाझ मीर यांना आमदार वसतीगृहात ताब्यात ठेवण्यात आले होते. तर, कामगार संघटनेचे नेते शकील कलंदर यांना केंद्रीय कारागृहात कैदेत ठेवण्यात आले होते. काल या दोघांची सुटका करण्यात आली. याआधी रविवारी, नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या चार नेत्यांची आमदार वसतिगृहातून सुटका करण्यात आली होती. आणखी १६ मुख्य नेते अजूनही कैदेत आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर कित्येक राजकीय नेत्यांना कैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता टप्प्याटप्प्याने त्या नेत्यांची सुटका करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना अजूनही नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा : कोरोना व्हायरस: केरळमध्ये २ हजार ४२१ नागरिक निरिक्षणाखाली