ETV Bharat / bharat

लडाखमधील हाडे गोठवणाऱ्या थंडीत जवानावर यशस्वी शस्त्रक्रिया

author img

By

Published : Nov 1, 2020, 8:28 PM IST

१६ हजार फूटावरील असय्य अशा वातावरणात जवानाचे अपेंडिक्सचे ऑपरेशन यशस्वीरित्या करण्यात आले. वैद्यकीय संसाधनांची कमतरता आणि प्रतिकूल हवामानात हे ऑपरेश करण्यात आले.

शस्त्रक्रिया यशस्वी
शस्त्रक्रिया यशस्वी

लेह - मागील काही महिन्यांपासून चिनी अतिक्रमणाला रोखण्यासाठी लडाखमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. लडाख हा डोंगराळ भूप्रदेश समुद्रसपाटीपासून सुमारे १६ हजार फूट उंचीवर आहे. प्रतिकूल परिस्थिती जवान भारताच्या सीमांचे रक्षण करत आहेत. उणे तापमान आणि हाडे गोठवणाऱ्या थंडीत जवानाचे अ‌ॅपेंडिक्सचे ऑपरेशन करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

पूर्व लडाखमधील सीमेजवळच्या लष्करी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. तीन डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली. जवानाची प्रकृती खालावल्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे डोंगराळ भागातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. अशा परिस्थितीत लष्करी पथकासोबत असलेल्या डॉक्टरांनी तेथेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कडाक्याची थंडी असल्याने डॉक्टरांपुढे अनेक अडचणी होत्या.

१६ हजार फूटावरील असय्य अशा वातावरणात अपेंडिक्स यशस्वीरित्या काढण्यात आले. शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यावर मात करत ऑपरेशन करण्यात आले. २८ ऑक्टोबरला ही शस्त्रक्रिया झाली. अतीउंच सीमाभाग आणि तीव्र थंडीत अशा प्रकारच्या खुप थोड्या शस्त्रक्रिया झाल्याचे जवानांनी सांगितले.

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी जवानांना गरम कपडे, तंबू, अन्न, वैदकीय मदत आणि साधनसामुग्री पुरविण्यात आली आहे. लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनीही लडाखमधील फॉर्वर्ड चौक्यांना भेटी देऊन जवानांना सर्व साहित्य मिळेल याची खात्री केली आहे. मे महिन्यात चीनसोबत सीमावाद सुरू झाल्यानंतर भारताने अतिरिक्त कूमक तैनात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.