नवी दिल्ली - देशातील सामान्य नागरिकांना देखील आता सैन्यामध्ये सहभागी होता येण्याची शक्यता दिसून येत आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना सैन्यामध्ये सहभागी करुन घेण्याचा विचार सध्या लष्कर करत आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
सध्या सैन्यामध्ये तरुण नागरिकांना दहा वर्षांच्या कालावधीसाठी 'शॉर्ट सर्व्हिस कमिशन'च्या अंतर्गत भरती करण्यात येते. त्याचप्रमाणे इतर नागरिकांनाही कमीत कमी तीन वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती करण्याचा विचार केला जात आहे. प्रतिभावान तरुणांनी सैन्यामध्ये सहभागी व्हावे यासाठी लष्कराकडून विविध प्रयत्न केले जात आहेत.
१.३ दशलक्ष एवढे बलाढ्य सैन्यदल असलेल्या लष्करामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठीदेखील हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, सध्यातरी हा केवळ प्रस्ताव असून याला मंजूरी मिळाल्यानंतरच हे शक्य होणार आहे.
हेही वाचा : 'संकटकाळात भाजप एकाधिकारशाही निर्माण करतेय'