ETV Bharat / bharat

दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना लष्कर प्रमुखांनी वाहिली श्रद्धांजली - Army chief General M M Naravane news

लष्कराने केलेल्या कारवाईत दोन दहतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईतून नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी लष्कराचा दृढनिश्चय आणि संकल्प दिसून येतो - नरवणे

Handwara encounter
लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे
author img

By

Published : May 3, 2020, 4:00 PM IST

Updated : May 3, 2020, 4:52 PM IST

नवी दिल्ली - काश्मीरमधील हंदवाडा भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी, दोन जवान आणि एक काश्मीर पोलीस दलातील अधिकारी, असे पाच जण शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांंना लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे यांनी श्रद्धांजली वाहिली.

लष्कराने केलेल्या कारवाईत दोन दहतवाद्यांचाही खात्मा करण्यात आला आहे. 'या कारवाईतून नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी लष्कराचा दृढनिश्चय आणि संकल्प दिसून येतो. 'सर्व्हिस बिफोर सेल्फ' म्हणजेच दुसऱ्यांची सेवा करत राहणे हे लष्कराचे उद्दिष्ट दिसून येते, असे नरवणे म्हणाले.

कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज, जम्मू काश्मीर पोलीस दलातील शकील काझी आणि दोन जवान चकमकीत शहीद झाले. १६ तास ही चकमक सुरू होती, अशी माहिती काश्मीरमधील लष्कराचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली. २१ राष्ट्रीय रायफलचे जवान आणि काश्मीर पोलीसांनी ही कारवाई केली. या सर्वांना लष्कर प्रमुखांनी श्रद्धांजली वाहिली.

Last Updated : May 3, 2020, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.