१६ कोटी मास्क घेणार विकत आंध्रप्रदेश सरकार; मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर घेतला निर्णय - आंध्र प्रदेश कोरोना
मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत राज्यातील १.४३ कोटी लोकांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यातील ३२,३४९ नागरिकांना वैद्यकीय चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे.
अमरावती - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्कचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. मात्र हाच मास्क विकत घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही. हेच लक्षात घेऊन आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मास्क देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने १६ कोटी मास्क्सची ऑर्डर दिली आहे.
मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत राज्यातील १.४३ कोटी लोकांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्यातील ३२,३४९ नागरिकांना वैद्यकीय चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, ९,१०७ लोकांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रविवारपर्यंत राज्यात कोरोनाचे ४१७ रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी १३ नागरिक परदेशातून आलेले आहेत, १२ त्यांचे निकटवर्तीय आहेत. दिल्लीतील निझामुद्दीन मरकज कार्यक्रमाला हजेरी लावलेले १९९, तर त्यांच्या संपर्कात आलेले १६१ रुग्ण आहेत.
हेही वाचा : कोरोना विरोधी 40 पेक्षा जास्त लसींचं काम प्रगतीपथावर, मात्र...