केरळ - अरणमुला औथराथ्याथी बोट रेस म्हणून ओळखली जाणारी आगळावेगळी अशी 'वार्षिक रेगट्टा स्पर्धा' नुकतीच पार पडली. या स्पर्धेअंतर्गत अनेक रंगीबेरंगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 'अ' गटातून मेलुकारा आणि 'ब' गटातून वानमाझी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
एकुण 52 सर्प बोटींनी या वार्षिक रेगट्टामध्ये भाग घेतला होता. राज्यमंत्री के. राजू यांनी बोट शर्यतीचे उद्घाटन केले. तर, पल्लिओडा सेवा संघाचे अध्यक्ष कृष्णकुमार कृष्णेवेनी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भुषवले. राज्याचे पर्यटनमंत्री कदमकमपिली सुरेंद्रन यांनी बोट शर्यतीला हिरवा झंडा दाखवल्यावर स्पर्धेला सुरवात झाली.
हेही वाचा - संकल्पातून उभे केले किचन गार्डन, कोथामंगलम पंचायतीच्या सरपंचांचा यशस्वी प्रयोग
उद्घाटन कार्यक्रमाचा भाग म्हणून विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची सुरुवात अ आणि भ श्रेणीतील नौकांच्या जलमिरवणुकीनंतर बोटींची शर्यत सुरू झाली होती. यावेळी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.