नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील रामबनच्या बटोतमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली. चकमक होणाऱ्यापुर्वी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या पोलीस अधिकारी अनिता शर्मा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या छतावर उभ्या राहून लपून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर येण्यास सांगत आहेत.
-
#WATCH Anita Sharma, SSP Ramban, asking terrorists to surrender during the encounter in Batote town of Ramban district of Jammu Zone, earlier today. #JammuAndKashmir pic.twitter.com/jcxGm3CkNy
— ANI (@ANI) September 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Anita Sharma, SSP Ramban, asking terrorists to surrender during the encounter in Batote town of Ramban district of Jammu Zone, earlier today. #JammuAndKashmir pic.twitter.com/jcxGm3CkNy
— ANI (@ANI) September 28, 2019#WATCH Anita Sharma, SSP Ramban, asking terrorists to surrender during the encounter in Batote town of Ramban district of Jammu Zone, earlier today. #JammuAndKashmir pic.twitter.com/jcxGm3CkNy
— ANI (@ANI) September 28, 2019
'ओसामा बाहेर ये. आम्ही असताना तुला काळजी करायची गरज नाही. तुला कोणीच धक्का ही लावणार नाही. सर्व शस्त्रासह नागरिकांना आधी बाहेर पाठव, असे त्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहीत करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत.
दहशतवादी इथल्या एका घरात घुसले आणि तेथील लोकांना कैद करुन ठेवले होते. यावेळी लष्कर दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित करत होते.
आंतकवाद्यांना बाहेर येण्याची वेळ देऊनही ते न आल्यामुळे सेनेन त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये तीन अतिरेकी ठार झाले आहेत. दरम्यान या गोळीबारात एक सैनिक ठार झाला तर दोन पोलिस जखमी झाले.