अमरावती - विशाखापटट्नममधील एका हॉटेलात स्वागत कक्षाजवळ अचानक बॉम्बस्फोट झाला. हॉटेलमधील ग्राहकांची पळापळ सुरू झाली. यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित होते, ब्रिटनचे उप उच्चायुक्त अॅड्र्यू फ्लेमिंग. हॉटेलवर हल्ला झाल्याचे समजताच ते घाबरून गेले आणि हॉटेलच्या मागच्या दरवाज्यातून पळून जायला लागले. अचानकपणे घडलेल्या घटनांनी हा ब्रिटीश अधिकारी पुरता गांगरून गेला.
हेही वाचा - '... तर पाकिस्तानी नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू'
क्षणार्धात शस्त्रसज्ज कमांडो हॉटेलचा ताबा घेतात आणि शोधमोहीम सुरू होते. काहीही कल्पना नसल्याने ब्रिटिश अधिकाऱ्याची चांगलीच धांदल उडाली. मात्र, हा दहशतवादी हल्ला नसून यामागील सत्य काही वेगळेच होते. विशाखापट्टणम पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा पथकाने मिळून एका मॉक ड्रिलचे आयोजन केले होते. त्याअंतर्गत ह्या सर्व घटना घडत होत्या. अधिकाऱ्यांची पळापळ पाहून हॉटेलमधील कर्मचारी हसायला लागले. त्यामुळे तर त्यांचा अधिकच पारा चढला.
हेही वाचा - केरळमध्ये स्वयंपाकघरातील नळातून पाण्याऐवजी आली चक्क दारू
ब्रिटनच्या या उप उच्चायुक्ताने पोलीस महासंचालकाकडे झालेल्या घटनेची तक्रार केली आहे. जर मला हृदयविकार असता तर याची जबाबदारी कोणी घेतली असती? असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. तसेच हॉटेल कर्मचाऱ्यांच्या अपमानास्पद वागणूकीबातही तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर पोलीस महासंचालकांनी खबरदारी घेण्याबाबत विशाखापट्टनमचे पोलीस आयुक्त आर. के. मीना यांना निर्देश दिले आहेत.
झालेल्या प्रकारानंतर पोलीस आयुक्तांनी ब्रिटनचे उप उच्चायुक्त अॅड्र्यू फ्लेमिंग यांची भेट घेतली. चिडलेल्या फ्लेमिंग यांनी तत्काळ मॉक ड्रिल करण्यात आलेले हॉटेल सोडून दुसऱ्या हॉटेलमध्ये सामान हलवले. मॉक ड्रिल बाबत हॉटेल प्रशासनाला एक आठवडा माहिती दिल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. मॉक ड्रिल खरी वाटावी म्हणून अशा प्रकारे नियोजन केले जाते. मात्र, त्यामुळे काही जणांची धांदल कशी उडते हे पहायला मिळाले.
हेही वाचा - रणजीत बच्चन यांच्या हत्येचे रहस्य उलगडले, पत्नीनेच रचला होता कट