विजयवाडा (आंध्रप्रदेश) - केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीनंतर ज्या-त्या राज्याने आपापल्या परिने सशर्त परवानगी दिली आहे. आंध्रप्रदेश सरकारनेही परवानगी दिली आहे. पण, मद्यपींनी दारुकडे पाठ फिरवावी म्हणून निषेधकर लावण्यात आला आहे.
आजपासून सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दारुविक्री करण्यात येणार आहे. अशी माहिती विशेष मुख्य सचिव रजत भार्गव यांनी दिली. ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमी टाळेबंदी असल्याने राज्याच्या महसुलात मोठे तुट निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आळा आहे. पण, यामध्ये काही शर्ती आहेत. त्यांचबरोबर महसुलात वाढ व्हावी म्हणून निषेध कर लावण्यात आल्याचेही भार्गव यांनी सांगितले.
आंध्र राज्यात सुमारे 3 हजार 500 दुकांनांना उघडण्याची परवानगी दिली आहे. बाजारपेठा, मॉलमधील दुकाने बंदच असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मद्यविक्रीवेळी सामाजिक अंतर ठेवावे, दुकानासमोर पाचपेक्षा अधिक ग्राहक थांबवू नये, अशा सुचनाही दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - कोरोना पाठोपाठ आता आफ्रिकी स्वाईन फ्लूचा भारतात शिरकाव