ETV Bharat / bharat

कोरेगाव भीमा दंगल : प्रा. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक - Police

पुणे सत्र न्यायालयाने ३१ जानेवारीला झालेल्या सुनावणीत तेलतुंबडे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

प्रा. आनंद तेलतुंबडे
author img

By

Published : Feb 2, 2019, 1:02 PM IST

मुंबई - कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात आरोपाचा ठपका असलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी मुंबई येथून आज पहाटे अटक केली. यापूर्वी झालेल्या सुनावणीत पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पुणे सत्र न्यायालयाने ३१ जानेवारीला झालेल्या सुनावणीत तेलतुंबडे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. देशात अराजकता माजवण्यासाठी तुम्ही कोरेगाव भीमा दंगल घडवून आणा, असा ठराव भारतीय कम्यूनिस्ट पक्षाने (माओवादी) केला, असा दावा न्यायालयामध्ये करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मात्र, एल्गार परिषदेच्या खटल्यामध्ये पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कोणत्याही पत्रामध्ये आनंद तेलतुंबडे यांचा थेट उल्लेख नाही. त्याचप्रमाणे कॉम्रेड प्रकाश म्हणजे प्रकाश आंबेडकर होऊ शकत नाही. मग, कॉम्रेडचा अर्थ आनंद तेलतुंबडे कसा होईल, असा युक्तीवाद तेलतुंबडे यांच्या वकिलांनी न्यायालायात मांडला होता.

Intro:Body:

कोरेगाव भीमा दंगल : प्रा. आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.