नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतरचा अमित शाह यांचा हा पहिला जम्मू-काश्मीर दौरा आहे. या दौऱ्यामध्ये अमित शाह अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत.
अमित शाह राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची देखील भेट घेणार आहेत. राज्यातील सुरक्षेसंबधी विषयावर त्याच्यासोबत चर्चा करतील. दरम्यान अमित शाह श्रीनगरमधील उच्चस्तरीय सुरक्षे संबधीत बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यावर ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यर्त्यांनादेखील संबोधित करणार आहेत.
यापुर्वीच्या कार्यक्रमानुसार अमित शाह 30 जूनला एका दिवसासाठी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये व्यस्त असल्याने त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता.
अमरनाथ यात्रा पुढील महिण्यात सुरु होणार आहे. 2017 मध्ये दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरुच्या बसवर हल्ला केला होता. यामध्ये आठ यात्रेकरु ठार झाले होते. तर एकोणवीस जण जखमी झाले होते.