ETV Bharat / bharat

लोप पावत चाललेली अल्मोडाची 'काष्ठ कला'

author img

By

Published : Nov 7, 2020, 8:31 PM IST

Updated : Nov 8, 2020, 6:00 PM IST

अल्मोडा शहरातून जाताना या नक्षीकाम केलेल्या खिडक्या आणि दरवाज्यांचे दर्शन होते. अशी नक्षीकामांनी नटलेली घरे बघितल्यानंतर असं वाटतं की जसं काही हे संपूर्ण शहर म्हणजे विश्वकर्माचीच निर्मिती आहे. एकेकाळी उत्कृष्ट कलेमुळे हे शहर कसे समृद्ध होते. याचा प्रत्यय ही घरे देतात.

Almoda's endangered 'wood art'
लोप पावत चाललेली अल्मोडाची 'काष्ठ कला'

अलमोडा - उत्तराखंडच्या कुमाऊ भागात नैसर्गिक सुंदरतेत समृद्ध असं अल्मोडा शहर वसले आहे. याच शहराने साडेतीनशे वर्ष जुन्या समृद्ध काष्ठकलेचा वारसादेखील जपला आहे. येथील घरांमध्ये आताही नक्षीकाम आणि उत्कृष्ट कलाकृतींचे नमुने सापडतात, याच कलाकृतींमुळे हे शहर ओळखले जायचे.

देशाची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रतिक मानलं जाणाऱ्या अल्मोडा शहरात उत्कृष्ट काष्ठकलेचे काही अप्रतिम उदाहरणं आताही दिसतात. या शहराच्या गौरवशाली इतिहासात राष्ट्रपिता महात्मा गांधी, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि स्वामी विवेकानंद यांच्या आठवणी देखील आहेत.

अल्मोडा हे शहर जवळपास साडेतीनशे वर्ष चंद राज्यकर्त्यांची राजधानी सुद्धा राहीले आहे. यासोबतच कत्यूर घाटीच्या कत्युरी राजांचा इतिहासदेखील याच्याशी जोडला गेलेला आहे. अशातच अल्मोडाच्या प्राचीन नक्षीकलेने केवळ देशातच नव्हे तर जगभरात आपली छाप सोडली आहे.

अल्मोडाचा जौहरी बाजार असेल की मग खजांची मोहल्ला. हे दोन्ही भाग शहराच्या सर्वात प्राचीन भागांपैकी आहेत. इथे आजही शेकडो वर्ष जुने वाडे शहराच्या सुंदरतेत भर टाकतात. या वाड्यांमध्ये काष्ठकलेचे विशेष महत्व आहे. हाथांनी लाकडावर केलेले कोरीवकाम आणि कलाकृती लोकांना आकर्षित करते. राजेशाहीपासून ते ब्रिटिश काळापर्यंतच्या इतिहासात या काष्ठकलेत राजस्थानी आणि दक्षिण भारतातील कलेची झलक पाहायला मिळत होती. मात्र, संरक्षणाअभावी काष्ठकला आता लोप पावत चालली आहे.

अल्मोडा ही चंद राजांची राजधानी होती. चंद राजांनी इथे अनेक किल्ले, वाड्यांचे निर्माण केले. ते आजही इथे अस्तित्वात आहेत. उत्तराखंडमध्ये आजही डोंगरांवर लाकडांची घरे आढळतात. ही घरे ४ ते ५ मजली असतात. प्रत्येक मजल्याची वेगळी खासियत आहे. मुख्य म्हणजे ही घरे १०० वर्षांपूर्वी बांधलेली असून ते भूकंपरोधी आहेत. पहाडी भागातील ही लोप पावत चाललेल्या कलेला वाचवण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही, तर त्यासाठी आपण सर्वांना पुढे यावे लागेल.

Last Updated : Nov 8, 2020, 6:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.