ETV Bharat / bharat

जेएनयू हिंसाचार : सर्वच स्तरातून निषेध - जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हिंसाचार बातमी

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे.

all people criticize jnu violence in new delhi
जेएनयू हिंसाचार : सर्वच स्तरातून निषेध
author img

By

Published : Jan 6, 2020, 6:23 AM IST

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) खळबळजनक घटना समोर आली आहे. चेहरे झाकून गुंडांची फौज विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्षा आयशा घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) गुंडांनी आमच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
या घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे.

काही प्रतिक्रिया -

  • जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल मला आश्चर्य वाटले. विद्यार्थ्यांनी पाशवी हल्ले केले. पोलिसांनी तातडीने हिंसाचार रोखून शांतता प्रस्थापित केली. जर आमचे विद्यार्थी युनिव्हर्स कॅम्पसमध्ये सुरक्षित नसतील तर देशाची प्रगती कशी होईल? - अरविंद केजरीवाल (मुख्यमंत्री, दिल्ली)
  • विद्यार्थ्यांवर जे हल्ले होत आहेत आणि जे हल्ले करत आहेत त्यांना पूर्णपणे सत्ताधाऱ्यांचे संरक्षण आहे. देशात विद्यापीठाच्या आत जाऊन विद्यार्थ्यांवर हल्ले होणे दुर्दैवी. - सलमान खुर्शीद (माजी परराष्ट्र मंत्री)
  • निवडणूकीत ज्या पक्षांना लोकांनी हरवले ती माणसं विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांचा सहारा घेऊन राजकारण करत आहेत. भाजप या घटनेची निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी करत आहे. - मनोज तिवारी (अध्यक्ष, दिल्ली भाजप)
  • जेएनयूमध्ये घूसून काही कार्यकर्त्यांनी तेथील विद्यार्थी आणि शिक्षकांना जबरी मारहाण केली. ही घटना संतापजनक आहे. या घटनेचा तीव्र निषेध. या घटनेची चौकशी होऊन हल्लेखोरावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. - सुप्रिया सुळे (खासदार, लोकसभा)
  • दिल्लीत कायदा व्यवस्था सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. भाजपने दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेला नष्ट करण्याचे काम केले आहे. कुठे झोपले आहेत अमित शाह ? - संजय सिंग (राज्यसभा खासदार, आम आदमी पार्टी)
  • एका मुलीचा बाप असल्याने तिच्या सुरक्षेसाठी चिंतित आहे. तिच्या सुरक्षेची माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. - डी. राजा (कम्युनिस्ट पक्षाचे नेते)
  • अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक विद्यार्थी जखमी नाही. ते खोटे आरोप करत आहेत. - वृंदा करात (नेत्या, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष)

Intro:Body:

comment on jnu violence

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.