हे आणखी एक जागतिक महायुद्ध आहे. मानवजात एक होऊन ही महान लढाई कधीही न संपणाऱ्या युद्धक्षेत्रात न दिसणाऱ्या परंतु भयानक शत्रूशी (कोरोना विषाणू) पोलादी इच्छेने लढत आहे. भारतासह, आंतरराष्ट्रीय समुदाय, कोरोनाला आळा घालून नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे संक्रमण कायदेशीर सैनिकात करून आणि मानवी समाजाच्या एकत्रित शक्तीसह आपल्या अधिकारात जे जे आहे ते करत आहे. हे शतकातील कधीही न ऐकलेले युद्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेने १० दिवसांपूर्वी कोविड-१९ महामारी जाहीर करेपर्यंत कोरोनाने ११४ देशांमधील १,८४,००० जणांना संसर्गग्रस्त करून ४,२९१ लोकांचे बळी घेतले होते. आता कोरोना १८० देशांमध्ये पसरला आहे आणि ३ लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाला आहे तर १३,७०० जण बळी गेले आहेत.
जागतिकीकरणाने संपूर्ण जगाला एका जागतिक खेड्यात रूपांतरित केले आहे. हवाई प्रवासाचा विस्तार अपेक्षेपलिकडे झाल्याने, भयंकर विषाणुने सर्वोच्च ५ पर्यटन देशांतील पर्यटकांवर हल्ला चढवला असून भारताला संभाव्य धोका आहेच. वुहानमध्ये भयानक विषाणुच्या सुरूवातीच्या जोरदार हल्ल्याची तीव्रता समजून घेण्यात चीन कमी पडला आणि मोठी किंमत चुकवावी लागली. त्यानंतर, आपली शक्ती त्याने सज्ज केली आणि यशस्वीपणे त्यावर नियंत्रण मिळवले. दक्षिण कोरिया आणि जर्मनीने बिजिंगच्या अनुभवापासून धडा घेतला आणि विषाणुची व्यापक निदानात्मक परीक्षां घेऊन मजबुती प्राप्त केली. तर इटलीला विषाणुला सहजपणे घेऊन दूरदर्शीपणाच्या अभावामुळे जोरदार नुकसान सोसावे लागले. अमेरिका आणि ब्रिटन जेव्हा घबराटीच्या अवस्थेत आहेत, अशा वेळेस भारत दुसऱ्या अवस्थेत असलेल्या विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी बहुआयामी पवित्रा घेऊन सज्ज होत आहे.
भारतातील जनता कर्फ्यूच्या प्रचंड यशानंतर, ११,०००हून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या आणि देशभरातील आंतरराज्य बस वाहतूक या महिन्याच्या अखेरीपर्यंत रद्द केली आहे. तेलंगण आणि आंध्रप्रदेशसह अनेक राज्ये त्यांच्या सीमा बंद करत आहेत. कोरोना ही अशी महामारी आहे की त्याला सध्याच्या घडीला औषध नाही. सरकारे, वैद्यकीय आरोग्य व्यावसायिक, लोक आणि माध्यमांनी त्याची लक्षणे आणि एका व्यक्तिकडून समूहाकडे धोकादायक वेगाने संक्रमण होते, याच्या व्यापक आकलनासह युद्धात हात मिळवले पाहिजेत.
एका शतकापूर्वी स्पॅनिश फ्ल्यू, जो जगातील १५ कोटी लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोकसंख्येला त्याचा संसर्ग झाला होता, त्यामुळे झालेल्या मृत्युमुळे उडालेला हाहाःकाराचा प्रतिध्वनी आजही इतिहासाच्या पानांमध्ये आहे. त्यानंतरच्या दशकांमध्ये लागलेल्या प्रतिजैविकांच्या शोधामुळे अशा आजारांची तीव्रता काही प्रमाणात थांबली. पण, २००३ मध्ये सार्स विषाणु आणि २०१३ मध्ये मध्यपूर्वेत आलेल्या फ्ल्यूमुळे पुन्हा भीतीची मानसिकता आणि आव्हान तयार झाले. या उलट, सध्याचा कोरोना हा या शतकातील भयानक आजार झाला असून त्याने अनेक देशांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रांवर परिणाम केला आहे.
चीनने आपले उद्योग बंद केल्याने तातडीच्या वैद्यकीय उपकरणांच्या टंचाईच्या आपत्कालीन परिस्थितीचा अमेरिकेलाही फटका बसत आहे. १९४१ मध्ये, फ्रँकलिन रूझवेल्ट यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन सरकारने अशा प्रमाणातील संकटात कसे नेतृत्व करायचे, ते जगाला दाखवून दिले. अमेरिकन वाहन उद्योगाने दुसर्या जागतिक महायुद्धाच्या काळात कारचे उत्पादन बंद केले आणि तासाला १० लढाऊ विमानांचे उत्पादन केले आणि देशाला विजयासाठी तयार केले. निदानात्मक परिक्षा तंत्रज्ञानात भारत मागे पडत आहे अशी भीती व्यक्त केली जात असताना, आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनी खासगी क्षेत्राला निदानात्मक परिक्षांना परवानगी देण्याचा घेतलेला निर्णय योग्य दिशेने आहे.
भारतासारख्या देशासाठी जनतेमध्ये कोरोनासारख्या रोगाने साथीचे स्वरूप घेण्यापूर्वीच जागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. चीनने ज्या पद्धतीने १० दिवसांमध्ये १००० खाटांचे रूग्णालय उभारले आणि डॉक्टरांनी फक्त डायपर्स घालून कोरोना रूग्णांवर दिवसरात्र उपचार केले ते निःस्वार्थ सेवेचे आणि सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेचे बेजोड उदाहरण आहे. विषाणुचा तपास करणाऱ्या केंद्रातील कर्मचार्यांचे अथक परिश्रम आणि वेळेशी स्पर्धा करत कोविड रूग्णांच्या सेवेत दिवसरात्र लागलेले डॉक्टर्स आणि परिचारिका हे कोणत्याही दैवी प्रयत्नांपेक्षा कमी नाही. विविध अभ्यासांनी असे दाखवून दिले आहे की कोविडवरील लस तयार होण्यासाठी अजून कमीत कमी दीड वर्ष तरी लागणार आहे. भारतात धोकादायक अशा तिसऱ्या अवस्थेत प्रवेश करण्यासाठी आता फक्त दोन आठवड्यांचा कालावधी उरला असताना, संपूर्ण देशाने आता एकजूट होऊन पुढे सरकण्याची आणि अशुभाचा सामना अत्यंत जोरदार इच्छाशक्तीने करण्याची वेळ आली आहे.
भारतासाठी ही अक्षरशः वैद्यकीय आणिबाणीची वेळ आहे. किशोरवयीन मुलेमुलीसुद्धा कोरोनातून सुटू शकत नाहीत, या जागतिक आरोग्य संघटनेच्या इषार्याच्या पार्ष्वभूमीवर, केंद्र आणि राज्यसरकारांनी एकत्र येऊन संयुक्त कृती योजना सुरू केली पाहिजे. विषाणुच्या प्रसार रोखण्याच्या एकमेव उद्देश्याने, सरकारे दररोजच्या आवश्यक वस्तु, जीवनावश्यक वैद्यकीय सेवा यांच्याशिवाय सर्व आस्थापनांच्या लॉकडाऊनचे आदेश देत असून सर्व नागरिकांना घरातच राहण्यासाठी निर्बंध घातले आहेत. देशाच्या ५ कोटी कामगारशक्तीपैकी ८५ टक्के कामगार हे अनौपचारिक क्षेत्रात आहेत. जेव्हा सर्व कंपन्या, उद्योग आणि स्वयंरोजगार देणारे स्त्रोत बंद करण्यात आले असल्याने, त्यांचे जीवन दयनीय बनले आहे. ब्रिटनने त्यांच्या कामगारांच्या वेतन बिलापैकी ८० टक्के रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे, तर फ्रान्स या संकटाच्या घडीला देशातील मोठ्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे त्या बंद कराव्या लागणार नाहीत. कल्याणकारी राज्य ही संकल्पना कर्मचारी आणि रोजगार निर्मिती करणारे उद्योग यांना लक्षात ठेवून तयार केली आहे.
हैदराबादच्या एका महिलेने सॅनिटायझर्स आणि मास्क्स विनामूल्य बनवून देण्याची सुरू केलेली सेवा प्रशंसनीय आहे. महामारीच्या विषाणुवर नियंत्रण मिळवण्यासाठी जेव्हा पोषण आहार अत्यंत महत्वाचा असताना, समाजमाध्यमांमध्ये पोल्ट्री उद्योगाबद्दल करण्यात आलेला अपप्रचार निषेधार्ह आहे. परिक्षेत पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांनी स्वतःला आणि इतरांनाही वाचवण्यासाठी स्वतःच्या घरीच होम क्वारंटाईनमध्ये जाण्याची दाखवलेली प्रामाणिक तयारी सर्वात महत्वाचे आहे. कोरोना रूग्ण ज्या भागातून गेले त्या भागांची माहिती जीपीएस मिळवण्यात आणि नंतर ती क्षेत्रे विषाणुपासून स्वच्छ करण्यात दक्षिण कोरियाला काहीसे यश मिळाले होते. तंत्रज्ञान आणि माध्यमांचा पाठिंबा आणि डॉक्टरांचा उदात्त त्याग, लोकांची सहकार्य करण्याची इच्छा यांनी सुसज्ज होऊन, कोरोना विषाणुविरूद्धचे हे ऐतिहासिक युद्ध आपण लढू या आणि जिंकू या. यासाठी आपली घोषणा असेल, एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक.