ETV Bharat / bharat

शिरोमणी अकाली दलाच्या एनडीए सोडण्याच्या निर्णयाचे अखिलेश यादवांनी केले स्वागत

" शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी अकाली दलने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. विरोधक, शेतकरी, भाजपच्या सोबतचे पक्ष आणि अगदी भाजपमधूनही सरकारच्या या निर्णयाचा विरोध होताना दिसून येत आहे, कारण त्यांना थेट लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे." असे यादव यावेळी म्हणाले.

Akhilesh Yadav welcomes SAD's decision to quit NDA against farm bills
शिरोमणी अकाली दलाच्या एनडीए सोडण्याच्या निर्णयाचे अखिलेश यादवांनी केले स्वागत
author img

By

Published : Sep 28, 2020, 7:57 AM IST

लखनऊ : समाजवादी पक्ष (सपा)चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. कृषी विधेयकांना विरोध म्हणून शनिवारी शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडले होते.

  • किसानों को भाजपा की शोषणकारी नीतियों से बचाने के लिए एक ज़िम्मेदार दल की तरह अकाली दल के एनडीए से अलग होने का स्वागत है.

    भाजपा के विरोध में न केवल जनता, विपक्ष व उनके सहयोगी दल हैं बल्कि उनके अपने कार्यकर्ता भी हैं क्योंकि उन्हें ही जनता के आक्रोश का सीधा सामना करना पड़ रहा है.

    — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"भाजपच्या शोषणात्मक धोरणांपासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी अकाली दलने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. विरोधक, शेतकरी, भाजपच्या सोबतचे पक्ष आणि अगदी भाजपमधूनही सरकारच्या या निर्णयाचा विरोध होताना दिसून येत आहे, कारण ते थेट लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे." असे यादव यावेळी म्हणाले.

केंद्र सरकारने विरोधकांच्या गदारोळात तीन कृषी विधेयके मंजूर करुन घेतली. या विधेयकांविरोधात शिरोमणी अकाली दलच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी यापूर्वीच राजीनामा दिला होता. त्यानंतर शनिवारी पक्षानेच एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जर सरकारला पंजाबच्या तीन कोटी शेतकऱ्यांचे दुःख दिसत नसेल, तर ही एनडीए वाजपेयी आणि बादल यांच्या संकल्पनेतील एनडीए नाही, अशी टीका यानंतर हरसिमरत कौर यांनी केली होती.

दरम्यान, देशभरातून प्रचंंड विरोध आणि आंदोलने होत असूनही रविवारी राष्ट्रपतींनी या तीन विधेयकांवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या तीन विधेयकांचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे.

हेही वाचा : शेतकऱ्यांचा विरोध असतानाही कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.