ETV Bharat / bharat

कोरोनाबाबतच्या समस्यांसाठी एअर इंडिया सुरू करणार 'कोविड-सेल'

हा कक्ष कोरोनासंबंधीच्या सर्व तक्रारींकडे लक्ष ठेवेल. या कक्षामध्ये अभियांत्रिकी, विमानांतर्गत सेवा, वैयक्तिक विभाग आणि वैद्यकीय सेवा यांमधील प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेले एक पथक असेल." अशी सूचना बन्सल यांनी एअर इंडियाच्या सर्व प्रादेशिक संचालकांना दिली.

Air India chief orders to create emergency COVID cell
कोरोनाबाबतच्या समस्यांसाठी एअर इंडियाने सुरू केले 'कोविड-सेल'
author img

By

Published : Jun 10, 2020, 3:34 AM IST

नवी दिल्ली - कोरोनाबाबतच्या सर्व तक्रारींचे अथवा समस्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी एअर इंडिया कोविड-सेलची स्थापना करणार आहे. कंपनीचे चेअरमन राजीव बन्सल यांनी मंगळवारी याबाबत घोषणा केली.

२५ मेपासून देशातील प्रवासी विमानसेवा पूर्ववत झाली आहे. "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, विमानसेवेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व प्रादेशिक संचालकांनी एक पूर्ववेळ काम करणाऱ्या कक्षाची स्थापना करावी. हा कक्ष कोरोनासंबंधी सर्व तक्रारींकडे लक्ष ठेवेल. या कक्षामध्ये अभियांत्रिकी, विमानांतर्गत सेवा, वैयक्तिक विभाग आणि वैद्यकीय सेवा यांमधील प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेले एक पथक असेल." अशी सूचना बन्सल यांनी एअर इंडियाच्या सर्व प्रादेशिक संचालकांना दिली.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीहून मॉस्कोला जाणारे एक विमान अर्ध्या वाटेतूनच परत फिरवावे लागले, कारण त्यामधील एका वैमानिकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मंगळवारी या विशेष कक्षाची घोषणा करण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एअर इंडियाचे एकूण ४० कर्मचारी हे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा : अमेरिकेतील ओसीआय कार्डधारकांसोबत मुंबई विमानतळावर गैरवर्तन, सात तास ठेवले बसवून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.