नवी दिल्ली - बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये वापरण्यात आलेले Spice-२००० हे बॉम्ब भारत खरेदी करणार आहे. या बॉम्बमध्ये कोणत्याही प्रकारची की बिल्डिंग आणि बंकर उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे. हा बॉम्ब वायूसेनेच्या भात्यात अत्यंत महत्त्वाचा असून अचूकपणे लक्ष्य भेदण्याची क्षमता यामध्ये आहे.
ही आहे Spice-२००० ची खासियत
- हा बॉम्ब इस्रायलद्वारे विकसित करण्यात आला आहे. त्याचा वापर फ्रान्सचे तंत्रज्ञान असलेल्या मिराज २००० या लढाऊ विमानांमध्ये केला जातो.
- याच्याद्वारे शत्रूच्या अत्यंत मजबूत तळाला लक्ष्य करणे आणि उद्ध्वस्त करणे शक्य आहे.
- स्पाइसचा (SPICE) अर्थ Smart, Precise Impact, Cost Effective (स्मार्ट, अचूक लक्ष्यभेद, आर्थिकदृष्ट्या परवडणारा) असा आहे.
- हा बॉम्ब 'लेसर गायडेड'ही आहे. याच्याद्वारे दूरवरूनही लक्ष्यभेद करणे शक्य आहे.
- राफेल अॅडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टमद्वारे तयार करण्यात आलेल्या या बॉम्बचा वापर भारत, इस्रायलसह अनेक देशांच्या वायूसेना याचा वापर करतात.
- या बॉम्बसाठी निर्धारित केलेले लक्ष्य गतिमान झाल्यास हा बॉम्ब स्वतःचाही रस्ता बदलू शकतो.
- स्पाइस २००० हा बॉम्ब २ व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. एका बॉम्बमध्ये १००० किलोग्रॅमचा वॉरहेड असतो. तर, दुसरा ५०० किलोग्रॅमचा असतो.