नवी दिल्ली- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. दिल्लीमध्ये आतापर्यंत 70 आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबिंयानादेखील कोरोनाची लागण होत आहे. रविवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान(एम्स)च्या एका नर्सचा आणि तिच्या दोन मुलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही नर्स कॅन्सर विभागात कार्यरत होती.
कॅन्सर विभागात काम करणाऱ्या नर्सचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एम्समध्ये खळबळ माजली होती. यामुळे शनिवारी कॅन्सर विभागात केमो करण्यासठी आलेल्या सर्व रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. शनिवारी नर्सने ज्या डॉक्टरला सहकार्य केले त्यालाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.
नर्स आणि तिच्या मुलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असले तरी तिच्या पतीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.