ETV Bharat / bharat

VIDEO : अहमदाबाद पोलिसांचा कहर, भाजीपाल्याच्या गाड्या दिल्या फेकून - गुजरात पोलीस व्हायरल व्हिडिओ

व्ही. के. चौधरी असे या निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. अहमदाबादच्या कृष्णनगर परिसरात काही पोलीस अधिकारी भाजीविक्रेत्यांना दमदाटी करत होते. तसेच या विक्रेत्यांचे गाडेही त्यांनी पलटले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.

Ahmedabad cops overturn fruits, vegetable carts, inspector suspended
अहमदाबादमध्ये पोलिसाने पलटला भाज्यांचा गाडा; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाला निलंबित..
author img

By

Published : Apr 1, 2020, 1:04 PM IST

गांधीनगर - गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. या पोलीस अधिकाऱ्याने काही भाजी विक्रेत्यांचे गाडी पलटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर गुजरातचे पोलीस महासंचालक शिवानंद झा यांनी या अधिकाऱ्याला निलंबित केले.

अहमदाबादमध्ये पोलिसाने भाज्यांचा गाडा पलटला; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाला निलंबित..

व्ही. के. चौधरी असे या निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. अहमदाबादच्या कृष्णनगर परिसरात काही पोलीस अधिकारी भाजीविक्रेत्यांना दमदाटी करत होते. तसेच या विक्रेत्यांचे गाडेही त्यांनी पलटले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. या विक्रेत्यांना पोलीस काठीने मारहाण करताही या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. झा यांनी या अधिकाऱ्याचे निलंबन करतानाच इतर पोलिसांनाही लोकांशी नीट वागण्याचे निर्देश दिले आहेत.

लॉकडाऊनदरम्यान आधीच हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या भाजीविक्रेत्यांनाही अशा प्रकाराला सामोरे जावे लागत असेल, तर गरीबांनी जगायचे कसे? अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर सोशल मीडियामध्ये येत आहेत.

हेही वाचा : Lockdown : अ‌ॅम्ब्युलन्समधून घरी जाण्यासाठी रचला स्वतःच्याच मृत्यूचा बनाव..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.