ETV Bharat / bharat

दुसऱ्या टप्प्यातही गंभीर गुन्हे करणारे उमेदवार रिंगणात; भाजप दुसऱ्या तर काँग्रेस 'या' क्रमांकावर - BJP

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकींमध्ये १३ राज्यातील ९७ लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. यासाठी एकूण १ हजार ६४४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. निवडणूक आयोगाला उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्यावरील गुन्ह्यांचा अभ्यास करण्यात आला.

गुन्हेगार नेता
author img

By

Published : Apr 14, 2019, 2:37 PM IST

नवी दिल्ली - देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पुढल्या ४ दिवसांमध्ये म्हणजेच १८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. देशभरातील जवळपास ९७ लोकसभा मतदारसंघामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडेल. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या रिंगणात गुन्हे दाखल असणाऱ्या उमेदवारांचा असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने अभ्यास केला. त्यावर एक नजर टाकू.

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकींमध्ये १३ राज्यातील ९७ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यासाठी एकूण १ हजार ६४४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. निवडणूक आयोगाला उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्यावरील गुन्ह्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यावरुन गंभीर आणि सामान्य गुन्हे, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

गंभीर गुन्हे म्हणजे काय ?
एडीआरने गंभीर गुन्हे ठरवण्यासाठी काही मापदंड ठरवले आहेत. त्यानुसार
१. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले उमेदवार.
२. आजमीनपात्र गुन्हे.
३. निवडणूकींशी संबंधीत गुन्हे.
४. सरकारी खजीन्याला नुकसान पोहोचवण्याचा अपराध.
५. हल्ला, हत्या, अपहरण आणि बलात्कार या सारखे गुन्हे.
६. लोक प्रतिनिधींच्या अधिनियमातील गुन्हे.
७. भ्रष्टाचार निरोधक अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल असेले उमेदवार गंभीर गुन्ह्यांच्या यादीत मोडतात.

एडीआरने एकूण १ हजार ६3४४ उमेदवारांपैकी १ हजार ५९० उमेदवारांची शपथपत्रे तपासून पाहिले. उरलेल्या ५४ उमेदवारांची शपथपत्रे स्पष्ट नसल्यामुळे त्यांची पडताळणी करणे शक्य झाले नाही. यावरुन पाहिल्यास रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांमध्ये १६७ म्हणजेच ११ टक्के उमेदवार हे गंभीर गुन्हेगार आहेत. तर, २५१ म्हणजेच १६ टक्के उमेदवारांवर सामान्य गुन्हे दाखल आहेत. उमेदवारांनी शपथपत्रात नमूद केल्यानुसार गुन्ह्यांचे खालील वर्गिकरण करण्यात आले.

Chart 3
गुन्ह्याचे प्रकार

दोष सिद्धझालेले उमेदवार - १५९० उमेदवारांपैकी ३ उमेदवारांनी आपल्यावर दोष सिद्ध झाल्याचे नमूद केले आहे.

हत्येचा दोष सिद्धझालेले उमेदवार - एकूण ६ उमेदवारांनी हत्या केल्याचे कबूल केले आहे. म्हणजेच त्यांच्यावर आयपीसीची कलम ३०२ अंतर्गत दोष सिद्ध झाला आहे.

हत्येचा प्रयत्न केलेले उमेदवार - १५९० उमेदवारांपैकी २५ उमेदवारांनी हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच भादंवीची कलम ३०७ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

अपहरण करणारे उमेदवार - उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रानुसार ८ उमेदवारांवर अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.

महिलांवर अत्याचार करणारे उमेदवार - दुसऱ्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांमध्ये जवळपास तब्बल १० उमेदवार यांनी महिलांवर अनन्य अत्याचार केला आहे. त्यामध्ये बलात्कार, महिलेचा विनय भंग करणे आणि त्यांच्यावर त्यासाठी हल्ला करणारेही उमेदवार रिंगणात आहेत. तसेच महिलेच्या पति किंवा कुटुंबियांवर क्रूरता करणारेही उमेदवार उभे आहेत.

उग्र भाषण देणारे उमेदवार - १५ उमेदवारांनी आपल्यावर उग्र भाषण देण्याचे गुन्हे दाखल असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.

Chart 1
गुन्हेगारीच्या प्रकारानुसार उमेदवारांची संख्या

कोणता पक्ष वरचढ -
दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकांमध्ये उभे असलेल्या उमेदवारांमध्ये पक्ष निहाय पडताळणी केल्यास धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसच्या ५३ पैकी २३ उमेदवार म्हणजेच ४३ टक्के उमेदवारांनी गुन्हा असल्याचे स्पष्ट केले.

तर भाजप दुसऱ्या क्रमांकार आहे. भाजपचे ५१ उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात आहेत त्यापैकी १६ म्हणेज एकूण ५१ उमेदवारांवर सामान्य गुन्हे दाखल आहेत. तर बसपच्या ८० पैकी १६ म्हणजेच २० टक्के उमेदवार गुन्ह्याखाली आहेत.

Chart 2
पक्षनिहाय उमेदवार

स्थानिक पक्षांनी मात्र दिलखुलासपणे गुन्हेगारांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये द्रविड मुनेत्र कागजम (डीएमके) चे १४ पैकी ११ म्हणजेच ४६ टक्के उमेदवार गुन्हेगार आहेत. तर, शिवसेनेचे ११ पैकी ४ म्हणजेच ३६ टक्के उमेदवारांवर सामान्य गुन्हे दाखल आहेत. तर, २२ पैकी ३ म्हणजेच १४ टक्के एआयएडीएमके पक्षाचे उमेदवार गुन्ह्याखाली आहेत.

गंभीर गुन्हेगारांवर नजर टाकली तर काँग्रेसच्या ३२ टक्के उमेदवार, भाजपच्या २० टक्के आणि बसपच्या १३ टक्के उमेदवार हे गंभीर गुन्हेगार आहेत. डीएमकेचे २९ टक्के उमेदवार आणि एआयएडीएमकेचे १४ टक्के उमेदवार आणि शिवसेनेच्या ९ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.