लंडन / नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी सध्या इग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. लंडनच्या रस्त्यांवर मोदी सध्या मोकळेपणाने फिरताना दिसत आहे. 'द टेलिग्राफ' या वृत्तपत्राने मोदीचा एक व्हिडिओ जारी केला आहे. यात नीरव मोदी लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. अलिबागमधील १०० कोटी रुपयांचा मोदीचा बंगला पाडल्यानंतरही तो लंडनधील ७० कोटींच्या आलिशान फ्लॅटमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे.
Exclusive: Telegraph journalists tracked down Nirav Modi, the billionaire diamond tycoon who is a suspect for the biggest banking fraud in India's historyhttps://t.co/PpsjGeFEsy pic.twitter.com/v3dN5NotzQ
— The Telegraph (@Telegraph) March 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Exclusive: Telegraph journalists tracked down Nirav Modi, the billionaire diamond tycoon who is a suspect for the biggest banking fraud in India's historyhttps://t.co/PpsjGeFEsy pic.twitter.com/v3dN5NotzQ
— The Telegraph (@Telegraph) March 8, 2019Exclusive: Telegraph journalists tracked down Nirav Modi, the billionaire diamond tycoon who is a suspect for the biggest banking fraud in India's historyhttps://t.co/PpsjGeFEsy pic.twitter.com/v3dN5NotzQ
— The Telegraph (@Telegraph) March 8, 2019
मोदीला टेलिग्राफच्या प्रतिनिधीने अनेक प्रश्नही विचारलेले या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, मोदीने कुठल्याच प्रश्नाला उत्तर दिले नाही. पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नाला मोदीने उत्तर देणे टाळले. पीएनबी या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात नीरव मोदी प्रमुख आरोपी आहे. गेल्यावर्षी मोदी भारतातून फरार झाला होता. गेल्यावर्षी जुलैमध्ये भारताच्या मागणीवरुन मोदीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
मोदीच्या भारतातील सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. नीरव मोदी याचा अलिबागच्या किहीम येथील रुप्पन्या बंगलाही जमीनदोस्त करण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस, महसूल, बांधकाम अधिकारी, कर्मचारीही यावेळी घटनास्थळी उपस्थित होते. सुरक्षिततेची काळजी म्हणून परिसरातील १०० मीटर पर्यंतचा परिसर मोकळा करण्यात आला होता. तसेच या परिसरात वाहनांनाही बंदी करण्यात आली होती.
स्फोटक तज्ज्ञांनी बंगल्यातील ३० पिलरला स्फोटक भरून वायरिंग केली. त्यानंतर स्फोट घडवून हा बंगला उद्ध्वस्त करण्यात आला. यासाठी रात्रीपासूनच काम सुरू होते. उपजिल्हाधिकारी भरत शितोळे यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. नीरव मोदीचा बंगला स्फोटकांनी उडवल्यानंतर काही सेकंदात पत्त्यासारखा कोसळला.