ETV Bharat / bharat

विकास चौधरी हत्या प्रकरण : प्रख्यात गुंड कौशलच्या पत्नी आणि नोकराला अटक

हरियाणातील फरिदाबाद येथे गुरुवारी सकाळी काँग्रेस प्रवक्ता विकास चौधरी यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

author img

By

Published : Jun 29, 2019, 1:14 PM IST

विकास चौधरी

फरीदाबाद - हरियाणातील फरिदाबाद येथे गुरुवारी सकाळी काँग्रेस प्रवक्ता विकास चौधरी यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी प्रख्यात गुंड कौशल याची पत्नी आणि तीचा नोकर यांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी मिळून विकास चौधरी यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांना गुरुग्राममधून अटक करण्यात आली आहे.

विकास चौधरी नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास सेक्टर-९ मधील हुडा मार्केट येथील पीएचसी जिमकडे निघाले होते. विकास चौधरी गाडीतून उतरताच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार चालू केला. विकास यांच्यावर जवळपास ८ ते १० गोळ्या झाडण्यात आल्या. विकास यांच्या गळ्यावर आणि छातीवर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या विकास यांना पृथला गावातील सर्वोदय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून विकास यांना मृत घोषित केले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.