नवी दिल्ली - जम्मू काश्मीर बाबत पाकिस्तान सध्या मोठ्या प्रमाणात त्रागा करत आहे, याच पार्श्वभूमीवर नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली यांनी जम्मू काश्मीर आणि कलम 370 हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले आहे. मालदीवमधील आयोजित हिंदी महासागर समेंलनामध्ये त्यांनी म्हटले.
-
Abrogation of Article 370 is India's internal matter: Nepal
— ANI Digital (@ani_digital) September 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI story | https://t.co/Yk0y3aY7PA pic.twitter.com/c9Ne30vprS
">Abrogation of Article 370 is India's internal matter: Nepal
— ANI Digital (@ani_digital) September 4, 2019
Read @ANI story | https://t.co/Yk0y3aY7PA pic.twitter.com/c9Ne30vprSAbrogation of Article 370 is India's internal matter: Nepal
— ANI Digital (@ani_digital) September 4, 2019
Read @ANI story | https://t.co/Yk0y3aY7PA pic.twitter.com/c9Ne30vprS
हे ही वाचा - तणावपूर्ण संबंधातही पाकिस्तान भारताकडून या गोष्टीची करणार आयात
भारत आणि पाकिस्तान दरम्यान असलेला तणाव लवकर संपण्याची मी आशा करतो. सार्क संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे इतर सदस्य राष्ट्रांना हे प्रकरण चर्चेच्या माध्यमातून मिटवण्याचे आव्हान करतो. कारण संघर्षातून काहीच हाती लागत नाही, असे ग्यावली म्हणाले.
हे ही वाचा - जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयाला भारतीय जनतेचा प्रचंड पाठिंबा - अल्ताफ हुसेन
यापुर्वी जम्मू-काश्मीरचा मुद्दा हा चर्चेने सोडवला पाहिजे असे नेपाळने म्हटले होते. त्यांनी हिमालयीन राष्ट्र प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेच्या बाजूने असल्याचेही सांगितले. हा वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवला पाहिजे. भारत सरकार हा वाद शांततेच्या मार्गाने सोडवेल याचा आम्हाला पूर्णपणे विश्वास असल्याचेही ते म्हणाले होते.