ETV Bharat / bharat

लेटर वॉर: मोदींना पत्र लिहेल्या त्या मान्यवरांविरूध्द देशद्रोहाचा खटला दाखल - साहित्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी पत्र लिहले होते. त्या मान्यवरांविरूध्द मुझफ्फरपूरच्या दिवाणी न्यायालयात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.

लेटर वॉर
author img

By

Published : Jul 27, 2019, 6:09 PM IST

मुझफ्फरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी पत्र लिहले होते. त्या मान्यवरांविरूध्द मुझफ्फरपूरच्या दिवाणी न्यायालयात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.

वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांच्याकडे खटला दाखल केला आहे. देशाची प्रतिमा आणि हिंसा भडकवण्याच्या हेतूने त्यांनी ते पत्र लिहल्याचा आरोप सुधीर ओझा यांनी केला आहे. यावर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

23 जुलैला देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्यामध्ये मणिरत्नम, अदूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश होता.

Intro:शेतीच्या वादातून तिघांची हत्या 

बीड- शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात   आल्याची घटना बीड तालुक्यातील वासनवाडी शिवारात  घडली आहे . यातील मयतांचा  पुतण्या गंभीररीत्या जखमी असून त्यानेच पोलिसांना शेतीच्या वादातून हाणामारी झाली असून त्यात आपण जखमी एकाचा  मृत्यू झाल्याचे   कळवले होते . प्रत्यक्षात घटनास्थळावरच दोघांचा मृत्यू झाला असून एका जखमींचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. 

बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण रस्त्यालगत वासनवाडी   शिवारात पवने कुटुंबाची शेतजमीन आहे. या चार एकर शेतीवरून भावकीचे वाद सुरु होते. त्यातूनच आज (दि. २७ ) सकाळी वाद झाले . यात किरण काशिनाथ पवणे , दिलीप काशिनाथ पवणे आणि प्रकाश काशिनाथ पवणे या तिघांचा मृत्यू झाला आहे. यांचा पुतण्या असलेला कल्पेश किसन पवणे  गंभीररीत्या जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपण शेतीत गेलो असता आपल्यावर किरण , दिलीप आणि प्रकाश यांनी  त्यात आपण जखमी झालो असून स्वतःला वाचविण्यासाठी आपणही त्यांच्यावर हल्ला केल्याचे कल्पेश याने पोलिसांना फोन करून   सांगितले असल्याची प्राथमिक माहिती आहे. 
पवणे कुटुंबातील हा शेतीचा वाद अनेक वर्षांपासूनचा आहे. कल्पेशचे वडील किसन पवणे आणि आणि या घटनेत मयत झालेले किरण . दिलीप आणि प्रकाश हे चौघे सख्खे भाऊ असून जमिनीच्या वादात उच्च न्यायालयाने किसन पवणे यांच्या बाजूने निकाल दिला मात्र त्या जमिनीवर मयत तिघांचा ताबा होता अशी माहिती आहे. त्यातूनच सकाळी कल्पेश शेतीत गेला असता वाद झाले आणि त्यातून तिघांचा मृत्यू झाला तर कल्पेश आणि सचिन हे दोघे भाऊ जखमी झाले आहेत. यातील कल्पेश हा वकील असून सचिन हा डॉक्टर आहे. कल्पेशचे वडील किसन पवणे यांच्याबाबत अद्याप कसलीच माहिती नाही . विशेष म्हणजे शुक्रवारीच यातील जखमी कल्पेश पवणे याने बीड शहर पोलिसात आपल्या जीविताला शेतीच्या वादातून धोका असल्याची तक्रार दिली होती अशी देखील माहिती आहे. 

दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी भेट दिली असून त्यांनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस उपाधीक्षक भास्कर सावंत , बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे आणि त्यांचे पथक, यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि दरोडा प्रतिबंधक पथकाचे जवान देखील घटनेचा शोध घेत असून घटनेत कोणती हत्यारे वापरली  असावीत याची माहिती घेत आहेत. अद्यापपर्यंत या प्रकरणात कसलाही गुन्हा दाखल झालेला नाही. 

हा वाद भावकीतील शेत जमिनीचा असून मालमत्तेच्या वादातूनच हा प्रकार घडला आहे. यातील जखमीने स्वतः फोन करून आम्हाला घटनेची कल्पना दिली . या प्रकरणात पुढील तपास सुरु आहे. 
भास्कर सावंत
उपविभागीय पोलीस अधिकारी , बीड 
Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.