ETV Bharat / bharat

सीसीटीव्ही फुटेज : फिल्मी स्टाईलने भररस्त्यावर मुलीचे अपहरण

किलारीपेठ येथील २२ वर्षीय शिवा नावाच्या मुलाचे देवांगापेठच्या एका मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून प्रेम होते. त्यांच्या या प्रेम प्रकरणाला विरोध करत मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या एका मुलाबरोबर ठरवले होते. त्यामुळे मुलीला पळवून नेण्याचा कट शिवाने रचला.

कोलार
कोलार
author img

By

Published : Aug 14, 2020, 2:48 PM IST

कोलार (कर्नाटक) - एखाद्या चित्रपटातील 'सीन'प्रमाणे प्रेयसीचे अपहरण करून तिला मोटारीतून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. किलारीपेठ येथील २२ वर्षीय शिवा नावाच्या मुलाचे देवांगापेठच्या एका मुलीवर गेल्या दोन वर्षांपासून प्रेम होते. त्यांच्या या प्रेमप्रकरणाला विरोध करत मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या एका मुलाबरोबर ठरवले होते. त्यामुळे मुलीला पळवून नेण्याचा कट शिवाने रचला.

फिल्मी स्टाईलने भररस्त्यावर मुलीचे अपहरण

आपल्या मित्रांच्या मदतीने शिवाने मुलीला जबरदस्तीने गाडीत घालत अपहरण केले. विशेष म्हणजे भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेची चर्चा परिसरात सर्वत्र होत आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार एमबी रस्त्यावरील रेड्डी इलेक्ट्रीक दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - कचरा वेचणाऱ्या महिलांच्या घरात सापडले दोन लाख रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.