नवी दिल्ली - दिल्ली राज्य कर्करोग रुग्णालयतात आणखी एक कोरोनाबाधित डॉक्टर आढळला आहे. त्यानंतर कोरोनाचे संक्रमन झालेल्या डॉक्टरांची संख्या ही ३ वर पोहोचली आहे. हा डॉक्टर कोरोना विषाणूचे संक्रमण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात होता. त्यानंतर या डॉक्टरला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.
आतापर्यंत दिल्लीमध्ये १०० पेक्षा अधिक लोक कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णांचा उपचार करताना डॉक्टरांना देखील कोरोना होत असल्याने प्रशासनापुढे एक मोठे संकट उभे ठाकले आहे. सध्या शहरातील लोकनायक जयप्रकाश, सफदरजंग आणि आरएमएल रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांचे उपचार सुरू आहेत. रोटेशन पद्धतीने डॉक्टर या रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र, रुग्णांबरोबर डॉक्टरांना देखील कोरोनाची बाधा होत असल्याने डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा- तबलीगी जमातच्या दिल्लीतील कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील १२६ लोक सहभागी झाल्याचे निष्पन्न