नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले 979 रुग्ण आत्तापर्यंत आढळून आले आहेत. यात 831 भारतीय तर 48 परदेशी रुग्णांचा समावेश आहे. यातील 87 जण पूर्णत: बरे झाले असून 25 जण दगावले आहेत. भारतातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत.
सर्वात जास्त 183 रुग्ण महाराष्ट्रात असून केरळमध्ये 174 जण आढळून आले आहेत. कर्नाटकात त्याखालोखाल 76 जण कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
विविध राज्ये आणि केंद्रशासित राज्यातील स्थिती -
आंध्र प्रदेश - 14, गुजरात 52, दिल्ली 38, जम्मू आणि काश्मीर 31, मध्य प्रदेश 30, हरियाणा 19, तेलंगाणा 56, तामिळनाडू 38, उत्तर प्रदेश 54, पंजाब, 38, पश्चिम बंगाल 17, लडाख 13.