ETV Bharat / bharat

आसाममध्ये महापुराचा कहर; ब्रम्हपुत्रेने धोका पातळी ओलांडली, 93 जणांचा बळी - assam floods news

कोरोनाचं संकट असताना आसामवर आता पूराचं संकट आलं आहे. या महापूरात आतापर्यंत तब्बल 93 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीच्या पाण्याने तब्बल 26 जिल्हे प्रभावीत झाले असून 74 महसूल मंडळांतर्गत असलेली 2 हजार 634 गावे पूरात बुडाली आहेत.

आसाम महापूर
आसाम महापूर
author img

By

Published : Jul 24, 2020, 9:55 AM IST

नवी दिल्ली - कोरोनाचं संकट असताना आसामवर आता पुराचे संकट आलं आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचणे प्रशासनाला कठीण जात आहे. ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. तर या महापूरात आतापर्यंत तब्बल 93 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

नदीच्या पाण्याने तब्बल 26 जिल्हे प्रभावीत झाले असून 74 महसूल मंडळांतर्गत असलेली 2 हजार 634 गावे पूरात बुडाली आहेत. संपूर्ण राज्यभरात सुमारे 28,32,410 जण बाधित झाले आहेत. तसेच 456 निवारा छावणीचा बाधितांनी आश्रय घेतला आहे. 1,19,435,93 हेक्टरवरील जमिनीला पूराचा फटका बसला आहे. अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएमए) दिली.

दरम्यान पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच प्रारंभिक रक्कम म्हणून 346 कोटी रुपये जाहीर करणार आहे. आसाम मध्ये सध्या सर्वत्र पुराच्या पाण्याचा वेढा दिसून येत आहे. आसाममधील नागरिकांना दरवर्षी अतिवृष्टीमुळे महापुराचा सामना करावा लागतो.

आसामच्या वेगवेगळ्या भागात संततधार पावसामुळे प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात ठिकठिकाणी पाणी भरले असल्याने वन्यजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. आपला जीव वाचवण्यासाठी प्राणी सुरक्षीत जागा शोधत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.