इस्लामाबाद (पाकिस्तान) - पंजाब प्रांतात तबलगी जमातीच्या ९ सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार ५०६वर पोहोचला आहे.
पंजाब प्राांतातील विविध जिल्ह्यांमध्ये आज बाधित रुग्ण आढळले आहे. दोन आठवड्यांपूर्वी तबलगी जमातीच्या १९८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांच्यापैकी ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
जॉन हॉफकीन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, जगभरात दोन मिलीयनपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, १ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या विषाणूमुळे जीव गमावला आहे. पाकिस्तानमध्ये ६ हजार ५०६ जणांना लागण झाली असून १२३ जणांचा मृत्यू झाला आहे.
खैरपूर डाहाजवळील धूर कोते येथील एका मशिदीत जिल्हा पोलिसांनी तबलीगी जमातीच्या सदस्यांना क्वारंटाईन केले आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यापैकी एकाला कोरोनाची लक्षणे दिसू लागली आणि नंतर त्या भागातील पहिला पॉझिटीव्ह रुग्ण ठरला, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर तबलीगी जमातीच्या अन्य कार्यकर्त्याचीही मशिदीतून रुग्णालयात नेण्यात आले.
तत्पूर्वी, तबलीगी जमातीने मार्चमध्ये लाहोरमध्ये अधिवेशन आयोजित केले होते. अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून या सदस्यांनी हा रोग देशभर पसरविला.