नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) 9 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.
दिल्लीमधील नरेला येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या 47 जवानांना क्वारेंटाइन करण्यात आले होते. त्यांपैकी 9 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या 9 जवानांना आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे. हे सर्व जण दिल्लीत तैनात होते.
यापूर्वी महाराष्ट्रातील मुंबई येथे तैनात असलेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या 11 जवानांना कोरोनाची लागण झाली होती. 11 जवानांपैकी एका जवानाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात बंदोबस्त करत असताना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.