ETV Bharat / bharat

'ब्लड बँके'चा रक्त देण्यास नकार; मध्यप्रदेशात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू

ब्लड बँकेकडे आम्ही १२०० रुपये जमा केले होते. पण, त्यांनी आम्हाला रक्त देण्यास नकार दिला. यानंतर मुलाच्या आईने इतर ठिकाणीही रक्त शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोठेही रक्त मिळाले नाही...

ब्लड बँक
author img

By

Published : Jul 18, 2019, 9:29 AM IST

भोपाळ - राज्यातील धामोह येथे ब्लड बँकेने रक्त देण्यास नकार दिल्याने ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अॅनिमीया आजाराने ग्रस्त असलेल्या या मुलाला धोमोह येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, वेळेत रक्त न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

ब्लड बँकेकडे आम्ही १२०० रुपये जमा केले होते. पण, त्यांनी आम्हाला रक्त देण्यास नकार दिला यानंतर मुलाच्या आईने इतर ठिकाणीही रक्त शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोठेही रक्त मिळाले नाही, असे मृत मुलाच्या एका नातेवाईकाने सांगितले.

रुग्णालयात दाखल केल्यापासूनच मुलाची प्रकृती नाजून असल्याने आम्ही त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास आम्ही सांगितले होते. मात्र, कुटुंबीयांनी मुलाला दुसऱ्या रुग्णालयात नेले नाही, असे सरकारी डॉक्टरांनी सांगितले. रक्त नाकारण्यात आले तेव्हा ब्लड बँकेमध्ये कोण कर्मचारी होते, याची चौकशी करणार असल्याचे डॉ. ममता तिमोरी यांनी सांगितले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.