नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. आज (मंगळवार) दिवसभरात राज्यात 729 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 जणांचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता 9 हजार 318 झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 400 जणांचा मृत्यू झाला आहे.
- दिल्ली - केंद्रीय सुरक्षा दलाच्या आणखी १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे.
- मुंबई - प्लाझ्मा थेरपीबाबत आयसीएमआरने काय सूचविले त्याबाबत व्यवस्थित माहिती नाही. मात्र, आम्ही प्रायोगिक तत्त्वावरच प्लाझ्मा थेरपीचा वापर करत आहोत. याचे दोन रुग्णांवर चांगले परिणाम पाहायला मिळाले, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
- कोलकाता - हावडा येथे बाजारात जमलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.
- मुंबई - धारावीमध्ये आज आणखी ४२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
- परभणी - जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कोरोनाग्रस्तांना सर्वात मोठी मदत; दिले एक कोटी रुपये
- पुणे - शहरात 28 एप्रिलला दुपारी ४ पर्यंत 75 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1423 वर पोहोचली आहे.
- गेल्या २४ तासांत देशात १ हजार ५९४ कोरोनाबाधितांची नोंद, तर ५१ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २९ हजार ९७४ वर पोहोचला आहे. यामध्ये २२०१० अॅक्टीव्ह केसेस, ७०२७ डिस्चार्ज, तर ९३७ मृत्यू झालेल्यांचा समावेश आहे.
- औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई-विरार महापालिकांवर प्रशासक नेमणार - निवडणूक आयोग अधिकारी
- कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर २३.३ टक्के आहे.
- प्लाझ्मा थेरेपीचा अद्यापही फक्त प्रयोग सुरू आहे. प्लाझ्मा थेरेपी धोकादायक ठरू शकते, ही पद्धती उपचार म्हणून वापरली जाऊ शकत नाही - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
- मुंबई - निर्जंतुकीकरणासाठी उद्यापासून मंत्रालय दोन दिवस बंद.
- औरंगाबाद - बिडकीन येथे ४० जण एकत्र येऊन नमाज पठण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आम्ही तिथे गेलो असता आमच्यावर दगडफेक सुरू केली. त्यामध्ये ३ पोलीस जखमी झाले असल्याचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले.
- मुंबई - वांद्रे गर्दी प्रकरणातील आरोपी विनय दुबेला जामीन मंजूर
- नागपूर - सतरंजीपुरा येथील ७५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि आणखी ५०० जणांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. या परिसरातून आतापर्यंत ८० रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
- पुणे - कोरोना संशयित रुग्णांसाठी मशिदीत उभारला क्वारंटाईन वॉर्ड
- मुंबई - धारावी येथे दारोदारी जाऊन कोरोनाची चाचणी करणाऱ्या ३ डॉक्टरांना कोरोनाची लागण
- सांगली - जिल्ह्यातील कामेरीमधील एकाला कोरोना लागण झाली असून तो कराडमध्ये असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा नातेवाईक आहे. त्यामुळे सांगलीत कोरोनाबाधितांची संख्या ३ वर पोहोचली आहे. - जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी
- सातारा - जिल्ह्यातील फलटण येथे सॅनिटायझर प्यायल्याने तिघांचा मृत्यू
- नवी दिल्ली - निती आयोगमधील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण
- मुंबई - राजस्थान कोटा शहरात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. बुधवारी धुळे जिल्ह्यातून १०० बसेस विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राजस्थानला रवाना होणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना परत आणून त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
- दिल्ली - गेल्या २४ तासांत १९० कोरोनाबाधित आढळून आले असून कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार १०८ वर पोहोचला आहे.
- केरळ - तिरुवनंतपुरम येथे सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसून शहराला हॉटस्पॉटमधून वगळण्यात आले आहे.
- औरंगाबाद - बिडकीन येथे पोलिसांनी सामूहिक नमाज पठण करण्यासाठी मज्जाव केला असता जमावाने पोलिसांवर हल्ला केला.
- पंजाब - महाराष्ट्रातील नांदेड गुरुद्वारामधून पंजाबला गेलेल्या भाविकांपैकी ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे घरवापसी केलेल्या सर्व भाविकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
- राजस्थान - गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवीन ६६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ३२८ वर पोहोचला आहे, तर ५१ जणांचे मृत्यू झाला आहे.
- नागपूर - नरेंद्र नगर येथे भाजीपाला घेण्यासाठी बाजारात गर्दी करणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. एकावेळी १० वाहनांना बाजारात प्रवेश दिला आहे.
- गेल्या २४ तासांत १ हजार ५४३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.