ETV Bharat / bharat

धक्कादायक...! लग्नात गेलेल्या महिलेसह तिच्या 5 मुलांचा कोरोनाने मृत्यू

author img

By

Published : Jul 21, 2020, 10:37 AM IST

Updated : Jul 21, 2020, 11:11 AM IST

परिवारातील सर्वात वृद्ध 88 वर्षाची महिला एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभात सहभागी झाली होती. यानंतर या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तसेच रानीबाजारमधील या महिलेचा 4 जुलैला बोकारोच्या चास येथील नीलम नर्सिंग होम येथे कोरोनाने मृत्यू झाला होता. यानंतर तिच्यासह एकामागे एक तिच्या पाच मुलांना कोरोनाची लागण झाली होती. यासर्वांचा कोरोनाने मृत्यू झाला.

6 person died in one family due to corona in dhanbad jharkhand
एकाच घरातील 6 जणांचा कोरोनाने मृत्यू

धनबाद (झारखंड) - लग्नसमारंभात सहभागी झालेल्या एका वृद्ध महिलेसह तिच्या पाच मुलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकानंतर एक अशी एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना धनबादच्या बाघमारा येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. तर लोकांमध्ये भयाचे वातावरण आहे.

या परिवारातील सर्वात वृद्ध 88 वर्षाची महिला एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभात सहभागी झाली होती. यानंतर या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तसेच रानीबाजारमधील या महिलेचा 4 जुलैला बोकारोच्या चास येथील नीलम नर्सिंग होम येथे कोरोनाने मृत्यू झाला होता. यानंतर तिच्यासह एकामागे एक तिच्या पाच मुलांना कोरोनाची लागण झाली होती. यासर्वांचा कोरोनाने मृत्यू झाला.

महिलेच्या मृत्यूनंतर यानंतर तिच्या दोन मुलांचा धनबाद येथे मृत्यू झाला होता. यातील एकाचा मृत्यू धनबाद कोविड-19 रुग्णालयात तर दुसऱ्याचा पीएमसीएच येथे झाला. यानंतर कोरोना संसर्ग झालेल्या तिसऱ्या रुग्णाला उपचारासाठी रांचीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुळे कतरास येथील चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर कतरास येथील रहिवाशांनाही धक्का बसला आहे.

बाघमारा कतरास परिसर आता कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. यानंतर रानीबाजार परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. क्षेत्राला प्रशासनाने सील केले आहे. सर्व लोक कोरोनाच्या भीतीने आपल्या घरांमध्येच आहेत.

Last Updated : Jul 21, 2020, 11:11 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.