ETV Bharat / bharat

देशात 52 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 803 कोरोना रुग्णांचा मृत्यू - कोरोना रुग्ण संख्या भारत

देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 12 लाख 30 हजार 501 झाली आहे. देशात सध्या 5 लाख 86 हजार 298 सक्रिय रुग्ण आहेत. तर 803 कोरोना रुग्णांचा काल (4 जुलै) मृत्यू झाला आहे. त्यामुळे, एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 38 हजार 938 झाली आहे.

corona patients india
corona patients india
author img

By

Published : Aug 5, 2020, 4:17 AM IST

हैदराबाद- देशात काल (4 जुलै) 52 हजार 50 कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 18 लाख 55 हजार 745 झाला आहे. तसेच, कोरोनापासून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा 12 लाखाच्या पार गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.

देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 12 लाख 30 हजार 509 झाली आहे. देशात सध्या 5 लाख 86 हजार 298 सक्रिय रुग्ण आहेत. तर 803 कोरोना रुग्णांचा काल (4 जुलै) मृत्यू झाला आहे. त्यामुळे, एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 38 हजार 938 झाली आहे.

corona patients india
corona patients india

मुंबईत काल 709 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

महाराष्ट्र- मुंबईत काल (4 जुलै) कोरोनाचे 709 नवे रुग्ण आढळून आले असून 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 18 हजार 130 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 546 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 873 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 90 हजार 962 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 20 हजार 326 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 77 टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवसांवर पोहोचला आहे.

दिल्लीत काल 674 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

दिल्ली- दिल्लीत काल 674 नवे कोरोना रुग्ण सापडले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राजधानीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 39 हजार 156 झाली आहे. काल 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने दिल्लीतील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 4 हजार 33 झाली आहे.

मध्यप्रदेशमध्ये 588 पोलिसांना कोरोना

मध्यप्रदेश- राज्यात आतापर्यंत 588 पोलिसांना कोरोना झाला आहे. यात अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. संसर्ग होऊ नये म्हणून राज्यातील जवळपास 2 हजार पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

भूवनेश्वर येथील सर्व कोरोना चाचणी केंद्रातील अहवाल ऑनलाईन प्रसिद्ध होणार

ओडिशा- कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या प्रक्रियेला गतिमान करण्यासाठी भूवनेश्वर येथील सर्व कोरोना चाचणी केंद्रातील कोरोना अहवालांना ऑनलाईन प्रसिद्ध केले जाणार आहेत. 6 ऑगस्टपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

राजस्थानात गेल्या 24 तासात 551 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राजस्थान- गेल्या 24 तासात राज्यात 551 नवे कोरोनाबाधित सापडले आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 46 हजार 106 झाला आहे. यातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 222 इतकी आहे. त्याचबरोबर, कोरोनामुळे 727 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटकात काल एका दिवसात सर्वाधिक 6 हजार 259 कोरोना रुग्णांची नोंद

कर्नाटक- राज्यात काल एका दिवसात सर्वाधिक 6 हजार 259 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 830 झाली आहे. तसेच, एकूण 2 हजार 704 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- 'राम मंदिर हे राष्ट्रिय एकात्मतेचे प्रतिक ठरेल'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.