श्रीनगर - श्रीनगरजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान हुतात्मा झाल्याची घटना सोमवारी घडली आहे.
माहितीनुसार, दहशतवाद्यांनी श्रीनगर शहराच्या सीमेवर टांगन बायपासजवळ सीआरपीएफच्या रोड ओपनिंग पार्टीवर (आरओपी) गोळीबार केला. यात दोन जवान हुतात्मा तर, तीन जवान जखमी झाल्याची माहिती आहे.
सीआरपीएफच्या ११० बटालियनचे जवान जम्मू-काश्मीर पोलिसांसमवेत शोधमोहीम राबवत होते. यादरम्यान काही अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार गेला. यामध्ये पाच जवान जखमी झाले होते, त्यांपैकी दोघांना उपचारादरम्यान वीरमरण प्राप्त झाले.
दरम्यान, हल्ला केलेल्यांपैकी दोन दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असल्याचे समोर आले आहे. यांपैकी एका पाकिस्तानी दहशतवाद्याने यापूर्वीही जवानांवर हल्ला केला आहे. तर, दुसरा दहशतवादी स्थानिक आहे.