ETV Bharat / bharat

दिल्लीहून हाथरसला जाणाऱ्या चौघांना अटक, कट्टरपंथी गटाशी संंबंधित असल्याचा संशय - हाथरस बलात्कार न्यूज

'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (पीएफआय) या कथित कट्टरपंथी गटाशी संबंधित असल्याच्या संशयावरून चौघांना सोमवारी मथुरा येथे अटक करण्यात आली. मथुराच्या मठ टोल प्लाझा येथून चौघांना ताब्यात घेण्यात आले होते. येथून काही संशयित लोक दिल्लीहून हाथरसकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस वाहनांची तपासणी करत होते.

दिल्लीहून हाथरसला जाणाऱ्या चौघांना अटक
दिल्लीहून हाथरसला जाणाऱ्या चौघांना अटक
author img

By

Published : Oct 6, 2020, 1:14 PM IST

Updated : Oct 6, 2020, 2:20 PM IST

लखनऊ (उत्तर प्रदेश) - 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (पीएफआय) कथित कट्टरपंथी गटाशी संबंधित असल्याच्या संशयावरून चौघांना सोमवारी मथुरा येथे अटक करण्यात आली. ते दिल्लीहून हाथरसला जात असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.

मथुराच्या मठ टोल प्लाझा येथून चौघांना ताब्यात घेण्यात आले होते. येथून काही संशयित लोक दिल्लीहून हाथरसकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस वाहनांची तपासणी करत होते. हे चौघे एका कारमध्ये होते आणि त्यांनी अतीक-उर रहमान (मुझफ्फरनगर), सिद्दीक (मलप्पुरम), मसूद अहमद (बहराइच) आणि आलम (रामपूर) अशी नावे आणि पत्ते सांगितले. शांतता व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे मोबाइल फोन, लॅपटॉप आणि इतर काही साहित्य जप्त केले. चौकशीदरम्यान, त्यांचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याची सहयोगी संस्था कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाशी (सीएफआय) संबंध असल्याचे पोलिसांना समजले आहे. पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - धक्कादायक! बलात्कारास विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलीवर पेट्रोल टाकत पेटवले

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या कथित कट्टरपंथी गटाने या वर्षाच्या सुरुवातीस देशभरात झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात काही निषेध आंदोलनांसाठी वित्तपुरवठा केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी यापूर्वी या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

14 सप्टेंबरला जिल्ह्यातील हाथरस या गावात 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना चर्चेत आली होती. याच्या पंधरा दिवसांनंतर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. तिच्या पालकांच्या संमतीविना रात्री उशिरा घाईघाईत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर येथे मोठा आक्रोश निर्माण झाला होता.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांचा उल्लेख करून समाजकंटक राज्यात जातीय हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा केला होता.

हेही वाचा - हाथरस बलात्कार प्रकरण : योगी सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Last Updated : Oct 6, 2020, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.