ETV Bharat / bharat

राजस्थानच्या सुरतगढमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू - राजस्थानच्या सुरतगढमध्ये भीषण अपघात

सुरतगढ-बिकानेर महामार्गावर ट्रक आणि बोलेरोची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यात 4 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी झाला.

सुरतगढ रस्ता अपघात
सुरतगढ रस्ता अपघात
author img

By

Published : Nov 28, 2020, 6:06 PM IST

सुरतगढ - सुरतगढ-बिकानेर महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ट्रक आणि बोलेरो गाडीदरम्यान टक्कर झाल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला.

सुरतगढमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

बोलेरोमधील सर्वजण आपल्या गावी रामसरमध्ये मतदान करण्यासाठी गेले होते. तेथून सुरतगढला परतताना हा अपघात झाला. बोलेरोमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, वाहनांना महामार्गावरून हटवले.

प्रवासी गाढ झोपेत असताना बस पेटली -

जयपूरमध्ये शुक्रवारी उच्च दाबाचा वीज प्रवाह असेलल्या तारेच्या संपर्कात स्लीपर बस आल्याने अपघात झाला होता. यावेळी अनेक प्रवासी गाढ झोपेत होते. बसमधील प्रवाशांना काही कळायच्या आत बसने पेट घेतल्याने गोंधळ उडाला. जयपूर शहराच्या जवळ दिल्ली महामार्गावर ही घटना घडली. तीन प्रवाशांचा आगीत मृत्यू झाला. तर सुमारे १२ जण जखमी झाले होते. बस पूर्णपणे जळून खाक झाली, तर बसचा सांगाडा शिल्लक राहीला.

हेही वाचा - 'मुख्यमंत्री असताना फडणवीस धमकी देतच होते! कुंडल्या हातात आहेत, हे कशाचे द्योतक?'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.